मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर मडगांव मांडवी एक्सप्रेसला (Mandovi Express) आग लागल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून लांब पल्ल्यांच्या गाड्यांना आग लागल्याच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. कोकण रेल्वे मार्गावर मांडवी एक्सप्रेसला अचानक आग लागल्याने स्टेशनवर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.
कोकण रेल्वे मार्गावर मांडवी एक्सप्रेसला आग pic.twitter.com/mFnGhJbNLl
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) November 1, 2023
मडगाव येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसला अचानक आग लागल्याची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी स्थानकाजवळ घडली.जनरेटर कार, दिव्यांग व गार्ड साठी असलेल्या डब्यात ही आग लागल्याचे समजत आहे. त्यानंतर सावंतवाडी स्थानकात गाडी आणून ही आग विझवण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या दुर्घटनेमुळे प्रवाशांना मोठा मनस्थाप सहन करावा लागला.