राज्यात निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त निवेदन काढत महा विकास आघाडीचे जास्तीत जास्त नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे.
राष्ट्रवादीच्या वतीने जयंत पाटील शिवसेनेच्या वतीने सुभाष देसाई आणि काँग्रेसच्या वतीने नाना पटोले यांनी संयुक्तरीत्या हे आवाहन केले आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला भरघोस यश मिळाले. आघाडीतील निवडून आलेल्या सदस्यांना@NCPspeaks, @ShivSena, @INCMaharashtra कडून आवाहन करण्यात येते की, महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त नगराध्यक्ष निवडून येतील यासाठी प्रयत्न करावेत. @Jayant_R_Patil @NANA_PATOLE pic.twitter.com/PpH8ZOztBl
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) January 30, 2022
नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरकारला मिळालेले यश आपल्याला कायम ठेवायचं असून राज्यातील जनतेचा विश्वास सार्थ करायचा आहे असं या निवेदनाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे