Akshay Gavte

Buldana News : महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण

1445 0

बुलढाणा : महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण आले आहे. अक्षय लक्ष्मण गवते असे या जवानाचे नाव आहे. तो बुलढाणा (Buldana News) तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील रहिवाशी होता.अक्षयच्या दु:खद निधनामुळे संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. सियाचीन मधील याचीन ग्लेशियर मध्ये कर्तव्यावर असताना अक्षय यांना वीरमरण आले. 20 ऑक्टोंबरच्या रात्री रुग्णालयात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.

अक्षय याच्यावर सोमवारी 23 ऑक्टोंबर ला सकाळी त्यांच्या जन्मगावी पिंपळगाव सराई येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 30 डिसेंबर 2022 रोजी अक्षय “अग्निवीर”म्हणून सैन्यात भरती झाले होते. सियाचीन मधील याचीन ग्लेशियर मध्ये ते कर्तव्यावर होते जिल्हा सैनिक कार्यालयाला प्राप्त माहितीनुसार प्रकृती अवस्थामुळेच त्यांना सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने रात्री त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

गेल्या वर्षी त्यांची अग्निवीर मध्ये भरती झाली अक्षय हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता अक्षय यांना एक लहान बहिण अक्षय यांचे आई वडील शेती करतात अक्षय यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे पिंपळगाव सराई गावावर शोककळा पसरली आहे. अक्षय गवते यांचे पार्थिव विमानाने चंदीगड, दिल्लीमार्गे छत्रपती संभाजीनगर येथे आणले जाणार आहे.

Share This News
error: Content is protected !!