शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय शिक्षक संघटनेने विविध प्रलंबित मागण्यांसाठी शैक्षणिक व प्रशासकीय कामांवर बहिष्कार टाकला आहे.याचा प्रशासकीय कामांसोबतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. महिन्याभरापासून एकही वर्ग झालेला नसल्याने १५०० वर विद्यार्थ्याचे शैक्षणिक नूकसान होत आहे.
वैद्यकीय शिक्षक संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालय याठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, तसेच शासकीय कर्करोग रुग्णालयातील जवळपास ५०० वैद्यकीय शिक्षक पलया आंदोलनात सहभागी आहेत. त्यांनी प्रशासकीय व शैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकला आहे. जोपर्यंत शासनाकडून मागण्यापुर्ण होत नाही. तोपर्यत माघार नाही. अशी भूमिका वैद्यकीय शिक्षक संघटनेने घेतली आहे. त्यामुळे घाटीत एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश होऊन महिना होत आला तरी अद्याप एकदाही वर्ग झालेला नाही.