निफाड तालुक्यातील चांदोरी येथे मुक्तसंचार करणारा बिबट्या जेरबंद (व्हिडिओ)

344 0

नाशिक- गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी येथे मुक्तसंचार करत जनावरांवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात आला आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिक आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

चांदोरी येथील जगन्नाथ सोनवणे यांच्या शेतात बिबट्याचा मुक्तसंचार सुरू होता. त्यामुळे वनविभागाने या ठिकाणी एक पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात आज पहाटेच्या दरम्यान सावजाच्या शोधात आलेला बिबट्या अडकला. या बिबट्याला वन विभागाने ताब्यात घेत निफाड येथील रोपवाटिकेत बिबट्याला आणले आहे. हा बिबट्या अंदाजे पाच ते सहा वर्षांचा नर जातीचा असल्याची माहिती वन विभागाने दिली. या बिबट्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्यानंतर पुन्हा जंगलात सोडून देण्यात येणार आहे.

अजून दोन ते तीन बिबटे असल्याची भीती गावकरी व्यक्त करत आहेत. त्यांनाही जेरबंद करा. हा परिसरा बिबट्या मुक्त करावा, अशी मागणी यावेळी वन विभागाकडे करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!