मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करणार, संभाजीराजे छत्रपतींची घोषणा (व्हिडिओ)

156 0

मुंबई- मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलने केली. परंतु अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो. परंतु आता मी उद्विग्न झालो असून मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीला मी स्वतः बेमुदत उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार असल्याची मोठी घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “2007 पासून मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मराठा समाज देखील वंचित घटक आहे. त्यासाठीच आरक्षणाची भूमिका घेतली. मी मराठा आहे म्हणून मराठा आरक्षणासाठी लढतो आहे असं नाही. 5 मे 2021 ला आरक्षण रद्द झालं. मागील काही दिवसांत अनेकवेळा आंदोलनं केली. परंतू अजूनही कोणतीच मागणी पूर्ण नाही. मी आत्तापर्यंत आक्रमक होतो परंतू आता मी उद्विग्न झालो आहे”

“मी सर्वांना घेऊन जाणारा माणूस आहे मी शाहू महाराजांचा वारस आहे. मला सगळ्यांना एवढचं सांगायचे आहे की आम्हाला टिकणारे आरक्षण द्या. मी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हात जोडून विनंती केली की आरक्षण द्या. आरक्षण कशामुळे गेलं हे देखील सांगितले परंतू काहीच हालचाल झाली नाही. मी आरक्षण रद्द झाल्यानंतर रिव्ह्यू पिटिशन दखल करा असं सांगितल. परंतु खूप दिवसांनंतर याचिका दाखल केली. सध्या त्याची काय परिस्थिती आहे हे काहीच माहिती नाही. माझं स्पष्ट मत आहे की समिती स्थापन करा. परंतुअजून काहीच केलं नसल्याचे संभाजीराजे म्हणाले.

“सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे की 50 टक्क्यांच्यावर आरक्षण द्यायचं असेल तर अपवादात्मक परिस्थिती असायला हवी. अनेकजण म्हणातात की ओबीसीमधून आरक्षण द्यायला हवं, परंतु माझं म्हणणं आहे की टिकणारं आरक्षण द्या. मला समन्वयक यांनी सांगितल की टोकाची भूमिका घेऊ नका. परंतु सरकार काहीच हालचाल करत नाही. त्यामुळे माझी भूमिका आहे की आता 26 फेब्रुवारीला मी स्वतः बेमुदत उपोषणाला मुंबईतील आझाद मैदानात बसणार आहे”

Share This News

Related Post

Gondia News

Gondia News : बंद पडलेली गाडी दुरुस्त करण्यासाठी थांबले अन् गमावला जीव

Posted by - October 31, 2023 0
गोंदिया : गोंदियामधून (Gondia News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातुन गेलेला राष्ट्रीय महामार्गावर आज…

समिती जो निर्णय घेईल तो मला… राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन निवृत्तीची घोषणा केल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Posted by - May 3, 2023 0
मुंबई: लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात त शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर…

केस गळतीने हैराण झाले आहात ? या घरगुती उपायांनी केवळ आठ दिवसात थांबू शकते केस गळती

Posted by - October 11, 2022 0
केस गळणे हा आजार नसून केवळ एक समस्या आहे. केस गळतीची अनेक कारणे असतात. यामध्ये प्रामुख्याने प्रदूषण, ताणतणाव, कोंडा किंवा…

पालकांसाठी महत्वाची माहिती : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

Posted by - July 13, 2022 0
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक,माध्यमिक तसेच सर्व खाजगी शाळांना 14 जुलैला (उद्या) सुट्टी जाहीर करण्यात आली…

#MNS : रवींद्र खेडेकर यांच्यासह सहा जणांची मनसेतून हकालपट्टी; कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी झाल्याने कारवाई

Posted by - February 22, 2023 0
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गटनेते साईनाथ बाबर यांनी दिलेल्या पत्रकानुसार रवींद्र खेडेकर, सागर पांगारे ,गोपी घोरपडे, अनिल बांदांगे ,रिजवान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *