प्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं आज निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. भारतीय अभिजात संगीतात पं. शर्मा यांचे योगदान अतुलनीय आहे. संतूर या काश्मीरमधील लोकवाद्याला अभिजात संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या शिवकुमार यांनी भारतीय चित्रपट संगीतातही फार मोठी कामगिरी बजावली.
संतूरवादनासोबतच ते एक उत्तम गायकही होते. संतूर या वाद्याला लोकप्रियता मिळवून देण्याचं श्रेय हे शर्मा यांनाच जातं. त्यांच्या मागे त्यांची पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा परिवार आहे.शिवकुमार शर्मा यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे. शिवकुमार शर्मा यांना १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, १९९१ मध्ये पद्मश्री तर २००१मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यासोबतच त्यांना १९८५ मध्ये बाल्टिमोर या संयुक्त राज्याचं मानद नागरिकत्वही प्रदान करण्यात आलं आहे.शिवकुमार शर्मा यांनी १९६७ साली बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित बृजभूषण काबरा यांच्यासोबत केलेला अल्बम ‘कॉल ऑफ द व्हॅली’ हा शास्त्रीय संगीतातला एक प्रसिद्ध अल्बम आहे. चित्रपटसृष्टीत त्यांनी १९८० साली सिलसिला या चित्रपटापासून सुरुवात केली. पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबत अनेकवेळा संगीत दिल्यामुळे या जोडीला शिव-हरी या नावाने प्रसिद्धी मिळाली.त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म 13 जानेवारी 1938 मध्ये झाला. ते मूळचे जम्मू येथील रहिवासी. त्यांच्या वडिलांनी त्यांना वयाच्या पाचव्या वर्षापासूनच शास्त्रीय गायन आणि तबल्याचे धडे द्यायला सुरुवात केली. संतूर वादन करण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाली. वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यांनी संतूर शिकण्यास प्रारंभ केला आणि आपल्या आईचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. आपल्या वादनकौशल्याचं पहिलं सादरीकरण त्यांनी 1955 मध्ये मुंबईत केलं होतं. संतूर या काश्मीरमधील लोकवाद्याला अभिजात संगीताच्या दरबारात मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या पं. शिवकुमार शर्मा यांनी भारतीय चित्रपट संगीतातही फार मोठी कामगिरी बजावली. ‘सिलसिला’ या चित्रपटाला बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बरोबर त्यांनी दिलेलं संगीत रसिकांच्या खूपच भावलं. ‘कॉल ऑफ द व्हॅली’ ही त्यांची ध्वनिमुद्रिका प्रचंड लोकप्रिय ठरली.
पं. हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काबरा यांच्याबरोबर त्यांनी वादन केलं होतं. हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूपच गाजली. ही जोडी ‘शीव-हरी’ या नावानं ओळखली जायची. या जोडीनं ‘सिलसिला’, ‘फासले, ‘चांदनी’, ‘लम्हे’, ‘डर’ या चित्रपटांना संगीत दिलं. पंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना 1985 मध्ये बाल्टीमोर, संयुक्त राज्यची मानद नागरिकता सुद्धा मिळाली. पंडित शिवकुमार शर्मा यांना 1986 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला तर 1991 मध्ये पद्मश्री आणि 2001 मध्ये पद्म विभूषण देऊन सन्म त्यांना सन्मानित करण्यात आलं.