खुनाचा प्रयत्न करून दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या तिघा सराईतांना अटक

373 0

पुणे- खुनाचा प्रयत्न करून दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार असणाऱ्या तिघा सराईत गुन्हेगारांना शिवाजीनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली. 

रणजित विलास परदेशी, श्रीनाथ उर्फ शेरू विलास परदेशी , चिराग महेश जोशी अशी तीन आरोपींची नावे आहेत. यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील आरोपी आज, मंगळवारी शिवाजीनगर परिसरात येणार असल्याची खात्रीलायक माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्याजवळ तिघांना ताब्यात घेतले. तिघा आरोपींची गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-01 श्रीमती प्रियंका नारनवरे, , सहायक पोलीस आयुक्त रमाकांत माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल क्षीरसागर, पोलीस हवालदार गुंड, राजपूत, फडतरे, साठे, भिवरे, पोलीस नाईक मेमाणे, पोलीस शिपाई राऊत, होळकर यांनी केली.

Share This News

Related Post

#कसबा पोटनिवडणूक : कसबा पेठ मतदार संघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

Posted by - February 22, 2023 0
पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयात करण्यात…

.. तर राज्यावर लोडशेडिंगचे संकट, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वड्डेटीवार यांचा इशारा

Posted by - April 8, 2022 0
पुणे- कोळसा तुटवड्यावर येत्या दोन ते तीन दिवसात तातडीने उपाययोजना न झाल्यास राज्यावर लोडशेडिंगचे संकट येऊ शकते असा इशारा मदत…

भेंडी खा निरोगी व्हा ! भेंडीची भाजी ही विविध अन्नद्रव्यांचे पॉवर हाऊस

Posted by - May 14, 2022 0
माणसाच्या ५० टक्के आजाराला त्याचे पोट कारणीभूत असते. पोट नीट असलं की स्वास्थ्य आलबेल राहू शकते. त्यासाठी एक साधी भाजी…
Milk

दारूपेक्षा ‘या’ दुधात सर्वाधिक नशा; दोन घोट पिताच लागाल झिंगायला

Posted by - June 1, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण दुधाकडे संपूर्ण आहार म्हणून पाहिलं जातं. दुधामध्ये शरीरालाआवश्यक सर्व पोषकतत्व जसे की प्रोटीन, अमीनो…

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

Posted by - March 30, 2022 0
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकीय धुळवडच सुरु आहे. यात केवळ आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आणि राजकीय कुस्ती सुरु…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *