Manohar Joshi

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची प्रकृती स्थिर; आयसीयूतून बाहेर हलविले

630 0

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आज आयसीयूमधून (ICU) बाहेर हलविण्यात आले आहे. हिंदुजा रुग्णालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. तसेच मनोहर जोशी हे अजूनही अर्धचेतन अवस्थेत असून तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या तब्येतीवर बारीक लक्ष ठेवून आहे असेदेखील रुग्णालयातून सांगण्यात आले आहे.

मनोहर जोशी यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांना 22 मे रोजी हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) दाखल करण्यात आले होते. मनोहर जोशी हे गेल्या अनेक दिवसांपासून अर्धचेतन अवस्थेत आहेत. यादरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी मनोहर जोशी यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती.

Share This News
error: Content is protected !!