……त्या वेळी राज साहेबांवर अग्रलेख लिहणाऱ्या “संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का ? मनसे नेते संदीप देशपांडे यांचं ट्विट

650 0

नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयावरून सत्ताधारी महाविकास आघाडी व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.

याच वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील उडी घेतली असून शिवसेना नेते संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जेव्हां राजसाहेबांनी वाईन शॉप चालू करा, कारण सरकारचा महसूल बुडतो आहे हे सांगितलं होतं.

त्यावेळेला साहेबांवर टीका करणारा अग्रलेख लिहिणाऱ्या “संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का?” असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरद्वारे शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारला आहे

Share This News
error: Content is protected !!