Maharashta Politics

Maharashta Politics : ‘या’ 6 काका-पुतण्यांच्या जोड्या ज्यांनी दिलं महाराष्टाच्या राजकारणाला नवे वळण

605 0

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचे राजकारण खूप खालच्या स्थरावर गेले आहे. आताचे सगळे नेते फक्त सत्तेसाठी हिकडे तिकडे जाताना दिसत आहेत. राज्याच्या राजकारणाला घराणेशाही ही काही नवी नाही. पण आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्याचा वाद पाहायला मिळाला. काका शरद पवार यांचा विरोध डावलून अजितदादा आज शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. काका आणि पुतण्याचा राजकारणात अध्याय हा जुना आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे या अध्यायाचे उत्तम उदाहरण आहे. चला तर मग आता काका- पुतण्याच्या राजकारणाचा इतिहास जाणून घेऊया….

1) बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे
शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही नेते चांगले मित्र आणि तितकेच राजकीय विरोधकही होते. पण दोन्ही घरात पुतण्याने वेगळी चूल मांडल्याचा प्रकार घडला आहे. याआधी राज ठाकरे यांनी पक्षातून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापना केला होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेना पक्ष सोपवल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत हा निर्णय घेतला होता.

2) गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे
स्वर्गीय भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे म्हणजेच बीड असं समीकरण राज्यात सर्वश्रुत आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भाजप पक्ष मराठवाड्यात रुजवला. आपल्या काकांचा हात धरुन धनंजय मुंडे राजकारणात आले.यानंतर राष्ट्रवादीने धनंजय मुंडेला आपल्या बाजूला सामावून घेतले. खुद्द अजितदादांच्या उपस्थितीत धनंजय मुंडेंनी बीडमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर त्यांनी 2019 च्या निवडणुकीत पंकजा मुंडेचा पराभव करत आमदारकी मिळवली.

Maharashtra Politics : आम्ही शरद पवरांसोबत राष्ट्रवादीच्या ‘या’ 5 आमदारांनी जाहीर केली आपली भूमिका

3) जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर
बीडमध्ये क्षीरसागर काका आणि पुतण्याचा संघर्ष अवघ्या बीडला सर्वश्रूत आहे. क्षीरसागर घराण्याने 3 वेळा खासदारकी भुषवली. पण काका जयदत्त क्षीरसागर आणि पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्या कमालीचा वाद विकोपाला गेला. पुतण्या संदीप यांनी राष्ट्रवादीकडून तर काका जयदत्त यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. या निवडणुकीत पुतण्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.

4) अवधूत तटकरे आणि सुनील तटकरे
राष्ट्रवादीमध्ये आणखी घराण्यात काका-पुतण्याचा वाद पाहण्यास मिळाला. राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे आणि त्यांचा पुतण्या अवधूत तटकरे. सुनील तटकरेंनी मुलगी आदिती तटकरे यांना राजकारणात आणल्यामुळे अवधूत तटकरे नाराज झाले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

5) अनिल देशमुख आणि आशिष देशमुख
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांच्याच चांगलाच राडा पाहण्यास मिळाला. खुद्द पुतण्या आशिष देशमुख यांनी काँग्रेसमधून 2014 ला निवडणूक लढवत काका अनिल देशमुख यांना पराभूत केले होते. यानंतर काका अनिल देशमुख आणि जोरदार पुनरागमन करत पुतण्या आशिष देशमुख यांचा 2019 च्या निवडणुकीत पराभव केला.

6) शरद पवार आणि अजित पवार
अजित पवार हे शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आले. काका पवारांनी वेळोवेळी अजितदादांनी मोठी जबाबदारी सोपवली आणि दोन वेळा राज्याचे उपमुख्यमंत्रिपदी बसवले. एवढंच नाहीतर अजितदादांची विरोधी पक्षनेतेपदी, गटनेतेपदीही निवड केली. पण अजित पवार हे काका शरद पवार यांचा विरोध डावलून शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाले.

Share This News

Related Post

Devendra Fadanvis Tension

Devendra Fadanvis : मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

Posted by - September 14, 2023 0
मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून सुरु केलेलं बेमुदत उपोषण अखेर आज 17 दिवसांनी मागे घेतले. मराठा आरक्षणासाठी आपला लढा…
Jharkhand ED Raids

Jharkhand ED Raids : काँग्रेस नेत्याच्या अडचणीमध्ये वाढ ! नोकराच्या घरी आढळले ‘एवढ्या’ कोटींचे घबाड

Posted by - May 6, 2024 0
रांची : ईडीने रांची झारखंडमधील अनेक ठिकाणी छापे (Jharkhand ED Raids) टाकून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. ग्रामीण…

सायरस मिस्त्री यांच्या निधनानं देशानं कर्तबगार उद्योगपती गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - September 4, 2022 0
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं आहे गाडी दुभाजकाला धडकल्यानं हा अपघात झाला असून मिस्त्री यांच्या…

बिहारमध्ये नितीश-तेजस्वी सरकार; आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या नितीश कुमार यांची कशी आहे राजकिय कारकीर्द ?

Posted by - August 10, 2022 0
पाटणा: भाजपशी फारकत घेतल्यानंतर जेडीयूने पुन्हा राजदशी  संसार थाटलाय आणि जेडीयूचे नितीश कुमार यांनी आज आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *