Balu-Dhanorkar

धानोरकरांची तीन दिवसात प्रकृती कशी बिघडली? डॉक्टर मित्राने सांगितले नेमके कारण

696 0

चंद्रपूर : चंद्रपूरचे (Chnadrapur) काँग्रेस (Congress) खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या पार्थिवावर आज सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. धानोरकरांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यादरम्यान आता धानोरकर यांचे जवळचे मित्र आणि तज्ज्ञ डॉक्टर सागर वझे (Dr. Sagar Waze) यांनी त्यांचा मृत्यू कसा झाला हे सांगितले आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्या रक्तात संसर्ग (Infection) पसरल्याने त्यांचा मृत्यू झाला असे तज्ज्ञ डॉक्टर सागर वझे यांनी सांगितले आहे.

डॉ. सागर वझे नेमके काय म्हणाले?
19 मेपासून बाळू धानोरकर यांना पोटात दुखायला लागलं आणि उलट्यांचा त्रास होत होता. त्यांची सोनोग्राफी करण्यात आली तेव्हा गॉलब्लॅडर स्टोन अर्थात पित्ताशयात खडे असल्याचे समोर आले. यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना नागपुरातील अरिहंत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी ते 36 तास नॉर्मल होते. व्यवस्थित चालत-बोलत होते, अशी माहिती डॉ. सागर वझे यांनी दिली.

यानंतर 27 तारखेला पहाटे अचानक बाळू धानोरकर यांचं ब्लड प्रेशर आणि पल्स लो होत गेली. ते वर आणण्यासाठी त्यांना औषध देण्यात आली. मात्र त्याचा काहीच उपयोग न झाल्याने ना वेंटिलेटरी सपोर्ट देण्यात आला. यानंतर त्यांच्या पित्ताशयाला सूज आणि संसर्ग होऊ लागला. त्यांच्या आतड्यात आणि रक्तात संसर्ग भिनू लागला. या संसर्गाचा केसांपासून नखापर्यंत प्रत्येक अवयवावर परिणाम होतो असे डॉ. सागर वझे यांनी सांगितले.

यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील मेदांता रुग्णालयात डॉ. रणधीर सूद यांच्या देखरेखीखाली अ‍ॅडमिट करण्यात आले. त्यांना हायर अँटिबायोटिक्स देण्यात आले. डायलिसीस युनिटला फिल्टर जोडण्यात आले. पहिल्या 24 तासात हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. संसर्ग फुफ्फुसात पसरल्याने त्यांना इक्मो देण्यात आला. परंतु ब्लड प्रेशर आणि पल्स पूर्ववत होत नव्हती. त्यानंतर हळूहळू कार्डिअ‍ॅक फेल्युरने त्यांचा मृत्यू झाला.

Share This News
error: Content is protected !!