बुलढाणा: बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव शहरातील सजनपुरी परिसरात लग्न समारंभ सुरु होता. यादरम्यान अचानक लग्न समारंभाच्या मंडपात भरधाव ऑटो रिक्षा घुसली. या अपघातात (Accident) दोन वऱ्हाडी जखमी झाले. यातील एक पुरुष वऱ्हाडी गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले मात्र त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.
रामू सावरकर असे मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे सजनपुरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी त्या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणली.