हल्ला केला म्हणून सोमय्या गप्प बसणार नाहीत, जशास तसे उत्तर देऊ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा

394 0

हल्ला केला म्हणून किरीट सोमय्या स्वस्थ बसणार नाहीत, भारतीय जनता पार्टी कायदेशीर पद्धतीने जशास तसे उत्तर देईल, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी दिला आहे.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले की, सभ्यतेचा पांघरलेला बुरखा आता फाटला असून सर्व ठिकाणी राज्यातील सत्ताधाऱ्यांचा मूळ चेहरा दिसू लागला आहे. मुद्दे संपल्यामुळे ते गुद्द्यांवर आले आहेत. भावना गवळी यांच्या प्रकरणात यवतमाळमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करण्यात आला म्हणून ते घाबरून घरी बसले नाहीत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात तर किरीट सोमय्या यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानीच स्थानबद्ध करायचा प्रयत्न झाला पण त्यामुळे ते घाबरून घरी बसले नाहीत. आजच्या शिवसैनिकांच्या हल्ल्यांमुळेही सोमय्या घाबरून गप्प बसणार नाहीत.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमचा कायद्यावर विश्वास आहे आणि आम्ही कायदेशीरपणेच उत्तर देऊ. पण जशास तसे उत्तर दिले जाईल.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!