मुंबई : अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांना (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यापैकी 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.अजित पवार यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नाही असे शरद पवार यांनी जाहीर केले.
Sangli News : सांगलीतल्या शेतकऱ्याचं पवार प्रेम; चक्क बैलाच्या अंगावर रेखाटली साहेबांची कलाकृती
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले होते की, 2019मध्ये शरद पवार साहेबांच्या प्रयत्नाने आमच्या बहुतांश आमदारांचा विजय झाला होता. त्यामुळे मी पवार साहेबांच्या सोबतच आहे. ज्या लोकांनी वेगळा निर्णय घेतला. त्याचे आम्हाला दुःख आहे. त्यांच्या जाण्याने आम्हाला सुद्धा वेदना झाल्या आहेत. पण गेलेल्या आमदारांपैकी बहुतांश आमदार आमच्या संपर्कात आहेत. हे सर्वजण निश्चित परत येतील असंही ते म्हणाले होते. पण आज त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
Maharashta Politics : ‘या’ 6 काका-पुतण्यांच्या जोड्या ज्यांनी दिलं महाराष्टाच्या राजकारणाला नवे वळण
राज्याच्या राजकारणात घडलेल्या नाट्यमय घडामोडी नंतर काही आमदारांनी अजित पवारांना (Ajit Pawar) पाठींबा दिला तर काहींनी शरद पवारांना पाठींबा दिला. यावर आमदार तनपुरे म्हणाले, मुंबई मध्ये जी बैठक झाली होती त्यांची मला कोणतीही कल्पना नव्हती. त्यानंतर त्यांनी आपण शरद पवार यांच्या सोबत असल्याचे जाहीर केले होते. पण आज आमदार प्राजक्त तनपुरे यांनी अजित पवारांची भेट घेतल्यामुळे तनपुरे यांचा पाठिंबा नेमका शरद पवारांना की अजित पवारांना आहे. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.