Jayant Patil

Ajit Pawar : अजित पवार गटाकडून जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी

792 0

मुंबई : अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेससोबत बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी करत त्यांच्या जागी सुनील तटकरे यांची नियुक्ती केली.त्यामुळे जयंत पाटील यांनी तात्काळ सुनील तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे द्यावीत अशी सूचना प्रफुल पटेल यांनी केली आहे.

तसेच राष्ट्रवादीच्या अजित पवार यांची आमदारांनी गटनेतेपदी निवड केली असून अनिल भाईदास पाटील हे मुख्य प्रतोद असतील असंही प्रफुल पटेल यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे कुणावरही अपात्रतेची कारवाई पक्षाद्वारे करता येऊ शकत नाही विधानसभेच्या अध्यक्षांकडे प्रकरण जातं. त्यानंतर लांबलचक प्रक्रिया पार पडते. असे प्रफुल पटेल म्हणाले.राष्ट्रवादीने अजित पवार आणि त्यांना साथ दिलेला आमदारांवर पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी कारवाईची नोटीस पाठवल्यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला.

Amol Kolhe : अमोल कोल्हेंच्या मनात चाललंय काय? काल अजित पवारांसोबत असलेले अमोल कोल्हे आज म्हणतात…

या पत्रकार परिषदेला स्वतः अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी संबोधित केलं. तुम्ही कुठल्याही नेत्यावर तुम्ही कारवाई करू शकत नाही किंवा कुठल्याही नियुक्त्या तुम्ही करू शकत नाही, आम्ही म्हणजेच पक्ष आहोत असे म्हणत अजित पवार त्यांनी शरद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना इशारा दिला आहे.

Share This News

Related Post

‘रिपाइं’ प्रदेश कार्यकारिणीत ॲड. मंदार जोशी यांची निवड

Posted by - October 1, 2022 0
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी सदस्यपदी ॲड. मंदार जोशी यांची निवड झाली आहे. ‘रिपाइं’चे…

पर्वती मतदार संघाच्या रेशनिंग कमिटीची मीटिंग तातडीने घ्या-अश्विनी कदम

Posted by - May 1, 2022 0
दर महिन्याच्या १५ ते १८ तारखे पर्यंत सर्व दुकानामध्ये अन्न-धान्य उपलब्ध होते व ते ३० तारखे पर्यंत वाटप करणे अपेक्षित…

विक्रांत युद्ध नौका निधी प्रकरण, किरीट सोमय्या, नील सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Posted by - April 7, 2022 0
मुंबई- आयएनएस विक्रांत या लढाऊ जहाजाच्या दुरुस्तीसाठी आर्थिक निधी सोमय्या पितापुत्रांनी राज्यपालांच्या सचिवांकडे जमा न करता त्याचा अपहार केल्याच्या आरोप…

BREAKING : शिंदे गटाची ‘बाळासाहेबांची शिवसेना’, तर उद्धव ठाकरेंना मिळालं पक्षासाठी ‘हे’ नाव ; वाचा सविस्तर

Posted by - October 10, 2022 0
मुंबई : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं नाव मिळाल आहे. तर उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब…

सोन्याचा नवीन विक्रम ! 28 महिन्यांचा मोडला रेकॉर्ड, वाचा आजचे सोन्याचे प्रति तोळा दर

Posted by - January 17, 2023 0
गेल्या काही वर्षापासून सोन्याच्या दारात विक्रमी वाढ झाली आहे. सध्या जगावर आर्थिक मंदीचं सावट घोंगावत असताना आता सामान्यांचं कंबरडं मोडल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *