लग्न असो किंवा वाढदिवस ,कॉलेज पार्टी किंवा ऑफिस पार्टी असो ,आजकाल छोट्या छोट्या कार्यक्रमांनाही मेकअप किंवा टचअप दिला जातो. अशामध्ये तुमचा चेहरा जर साफ असेल तर मेकअप करायला सोपे जाते पण जर त्यावर कुठले डाग ,पुरळ ,वांग किंवा पिंपल असतील तर या परिस्थितीत मेकअप करणे एक आव्हनच असते. चेहऱ्यावर वांग जर असेल तर मेकअप करणे थोडे अवघड ठरू शकते.वांग हा संपूर्ण चेहऱ्यावर छोट्या तिळांसारखा असू शकतो किंवा गालांवर आणि नाक तसेच ओठांवर व डोळ्याशेजारी असू शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत कि, तुमच्या चेहऱ्यावर वांग असेल तर कुठल्या पद्धतीने मेकअप करू शकता.
या पद्धतीनं मेकअप करून चेहऱ्यावरील वांग लपवू शकता.
मेकअप करताना सर्वप्रथम तुमचा चेहरा पाण्याने धुऊन घ्या.हलक्या हाताने चेहरा पुसून घ्या. त्वचेवर डायरेक्ट मेकअप जर करत असाल तर त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात .त्यामुळे मेकअपपूर्वी त्यावर लोशन लावा.त्यानंतर थोड्यावेळाने प्राईमर लावा. आता तुम्ही तुमच्या पसंतीच्या शेड्स चे कंन्सिलर लावा. चेहऱ्यावरील वांगसाठी कंन्सिलर लावणे आवश्यक आहे.कारण कि फक्त फॉउंडेशनने वांगाचे डाग लपवू शकत नाहीत त्यामुळे फॉउंडेशनच्या अगोदर कंन्सिलर लावणे खूप आवश्यक आहे.
या पद्धतीनं कंन्सिलर लावू शकता
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील वांगासाठी योग्य शेड्सच्या कंन्सिलरची निवड करावी लागेल.तुमच्या चेहऱ्याच्या ज्या ज्या भागावर वांगाचे डाग आहेत त्या ठिकाणी कंन्सिलर लावा वडॅब करा . कंन्सिलरची निवड करताना अगदी लाईट कलर ची निवड करू नका कारण ,वांगाचे डाग हे लाईट कलरने लपवले जाणार नाहीत .त्यामुळे कंन्सिलर हे डार्क शेड्सचे वापरावे.
या पद्धतीनं लावा फॉउंडेशन
चेहऱ्यावर ज्या ठिकाणी वांग आहेत त्या ठिकाणी फॉउंडेशन हातावर घेऊन वांगाच्या ठिकाणी ठिपक्यांच्या स्वरूपात लावावं नंतर ब्लेंडरच्या साहाय्याने सगळीकडे पसरवून ब्लेंड करावे वांग असलेल्या ठिकाणी जास्त फॉउंडेशन लावू नये कारण ,त्या ठिकाणी त्वचेवर थर दिसेल.त्यामुळे फॉउंडेशन सगळीकडे एकसारख्या प्रमाणात लावावे .फॉउंडेशनची निवड करताना तुम्ही तुमच्या त्वचेनुसार करा किंवा ब्युटिशियनचा सल्ला घ्या.
आता तुमच्या चेहऱ्याचा बेस मेकअपसाठी तयार आहे.त्यावर तुम्ही तुमच्या पार्टीनुसार. आवडीच्या कलर चे ब्लॅशर लावू शकता .गालावर जर वांगाचे डाग असतील तर जास्त डार्क कलर चे ब्लश वापरू शकता. चेहरा अधिक उठावदार दिसण्यासाठी आयब्रोज डार्क करा . लिपस्टिक सुद्दा तुम्ही तुमच्या पसंतीची लावू शकता पण डार्क लिपस्टिक चेहऱ्याला उठून दिसते व त्यामुळे वांगाचे डाग सुद्धा जास्त लक्षात येत नाहीत.
वरील टिप्स वापरून तुम्ही अशा सोप्या पद्धतीनं मेकअप करू शकता. वांगाचे डाग घालवण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.वांगाचे डाग फेंट होऊ शकतात पण पूर्णपणे जाऊ शकत नाहीत.उन्हात जर गेले तर डाग अजून डार्क होतात त्यामुले उन्हात जाताना चेहरा झाकून जायला पाहिजे आणि सणस्क्रिन लोशनचा उपयोग करू शकता. कुठलेही फंकशन असो या पद्धतीनं मेकअप करून वांगाचे डाग लपवू शकता.
awesome