Weight Loss

Weight loss : ‘हेल्दी अँड फिट’ बॉडी मिळवण्यासाठी ‘ही’ योगासने नक्की ट्राय करा

502 0

योग्य आहार आणि योगासन करून तुम्ही वजन कमी (Weight loss) करू शकता. योगासनामुळे तुम्ही शारीरिक व मानसिक दृष्ट्या निरोगी राहू शकता. यामुळे वजन कमी (Weight loss) होते, सोबतच शरीराच्या प्रत्येक अवयवाला व्यायाम मिळतो, ज्यामुळे त्यांच्या कामकाजात सुधारणा होते. आज आम्ही तुम्हाला अशी काही योगासने सांगणार आहेत जे तुम्ही नियमित केले तर तुमचा लट्ठपणा दूर होऊ शकतो.

ही योगासन करा
1 जानुशीर्षासन
जीम आणि डाएटने सुद्धा वजन कमी (Weight loss) होत नसेल तर, तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जानुशीर्षासनाद्वारे सुद्धा आपले पोट कमी करू शकता.

2 सिद्धासन
सिद्धासन एक प्रचलित योगासन आहे, जे प्राचीन काळापासून तप अभ्यास म्हणून सुद्धा केले जाते. हे योगासन केल्याने शरीरात लवचिकपणा येतो.

3 अर्ध मत्स्येंद्रासन
हे योगासन केल्यान पचनशक्ती सुधारते. लीव्हर आणि पाचक ग्रंथीसंबंधी समस्या दूर होतात.

4 गरुडासन
हे योगासन केल्याने शरीरात रक्तस्त्राव वाढतो, जो सेक्सदरम्यान इरेक्शनमध्ये मदत करतो.

5 पवनमुक्तासन
हे योगासन शरीरात जमा झालेला अनावश्यक गॅस बाहेर काढण्यासाठी केले जाते. हे आसन केल्याने पचनशक्ती सुधारते आणि बद्धकोष्ठता असल्यास तिच्यापासून सुटका मिळते.

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. वरील योगासने करण्याच्या अगोदर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Share This News
error: Content is protected !!