सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) एक मन हेलावून टाकणारी घडली आहे. यामध्ये जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतल्याने 15 मिनिटांच्या अंतराने बापलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला आहे. ही धक्कादायक घटना साताऱ्यातील (Satara News) फलटण शहरामध्ये घडली आहे.
Neem Leaves : ‘या’ झाडाची पाने, सकाळी रिकाम्या पोटी खा, शुगर पूर्णपणे नष्ट होईल
काय आहे नेमके प्रकरण?
हणमंतराव पोतेकर आणि अमित पोतेकर असे मृत पावलेल्या बापलेकाचे नाव आहे. वडील हनुमंतराव आणि त्यांच्या मुलाने कुटुंबासमवेत जेवण केलं, त्यानंतर आयुर्वेदिक काढा सर्वांनी घेतला. मध्यरात्रीच्या सुमारास हनुमंतराव ,मुलगा अमित आणि त्यांची मुलगी या तिघांना त्रास होऊ लागला. त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Weight loss : ‘हेल्दी अँड फिट’ बॉडी मिळवण्यासाठी ‘ही’ योगासने नक्की ट्राय करा
यानंतर आज पहाटे हनुमंतराव पोतेकर आणि त्यानंतर पंधरा मिनिटांनी अमित पोतेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मुलीची तब्येत सुधारली आहे. मात्र बाप- लेकाला जीव गमवावा लागला. मात्र या दोघांचा मृत्यू नेमका कशामुळे हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. त्यांचा मृत्यू विषबाधेमुळे मृत्यू झाला की अन्य कोणत्या कारणामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. या घटनेमुळे फलटण (Satara News) शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.