आपल्या 5 ज्ञानेंद्रियामध्ये कान (Ear Tips) हे एक महत्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. पाणी, हवा, धूळ किंवा माती यामुळे कानात (Ear Tips) घाण जमा होऊ लागते. यालाच ईअर वॅक्स किंवा कानातील मळ (earwax) म्हणतात. तो काढण्यासाठी, कान साफ करण्यासाठी लोकं कॉटन बड्सचा (cotton buds) उपयोग करतात. शहराकडील भागांमध्ये कॉटन बड्स वापर करण्याचे प्रमाण जास्त आहे. पण त्याने खरंच कान साफ होतात की कानांचे नुकसान होते?
कान स्वच्छ करण्यासाठी कॉटन बड्सचा वापर करणे योग्य नसते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जेव्हा आपण कॉटन बड्स कानात टाकतो, तेव्हा कानातील घाण बाहेर काढण्याऐवजी ती आणखी आत ढकलली जाते. त्यामुळे कानात इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. यामुळे कानाला त्रास होऊ शकतो, तसेच कॉटन बड्समुळे कानाच्या पडद्याचेही नुकसान होऊ शकते. यामुळे ऐकू येण्याच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो.
आपोआप निघतो कानाचा मळ
आपल्या शरीराची स्वतःला स्वच्छ करण्याची प्रक्रिया असते. तसेच कान देखील स्वतःला स्वच्छ करतात. कधी कधी कानातून घाण बाहेर येते आणि मळही निघतो. त्यामुळे रोजच्या रोज कान साफ केलेच पाहिजे असेही नाही.
कानाची सफाई कशी करावी?
कान (Ear Tips) स्वच्छ करण्याचा उत्तम उपाय म्हणजे कानात तेल घालणे. कानात तेल घातल्याने आतील घाण किंवा मळ मऊ होतो आणि बाहेर येतो. हा मळ तुम्ही कापडाच्या मदतीने सहज काढू शकता. तसेच आंघोळ करताना कान स्वच्छ करणे आवश्यक आहे.
(वरील सर्व माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आम्ही याला कोणताही दुजोरा देत नाही. वरील कोणताही उपाय करण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)