Health Tips

Health Tips : तुम्हाला पण दिवसा खूप झोप येते? ‘हे’ ट्राय करा ओव्हर स्लिपिंग संबंधित समस्या होईल दूर

386 0

जास्त झोपणे आरोग्यासाठी (Health Tips) घातक ठरू शकते, अशा परिस्थितीत तुमच्या जीवनशैलीत काही सुधारणा करून तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की जास्त झोपणे (Health Tips) हे कोणत्याही आजाराचे लक्षण आहे का किंवा त्यांना कोणताही गंभीर आजार झाला आहे का? दिवसभर या गोष्टींचा विचार केल्याने तुमच्या मनावर आणखी दबाव वाढतो आणि त्यामुळे तुम्हाला रात्री नीट झोप येत नाही आणि इतर अनेक आजारांना बळी पडतात. जास्त विचार करण्यावर कोणताही इलाज नाही, पण या उपायांनी तुम्ही जास्त झोपेची समस्या दूर करू शकता. हे उपाय खालीलप्रमाणे आहेत.

1. झोपेच्या आणि उठण्याच्या वेळा सेट करा
2. रूमचे तापमान तुमच्यानुसार सेट करा
3. जर तुम्हाला अंधाराची भीती वाटत नसेल तर दिवे बंद करून झोपा.
4. आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्या
5. रात्री पोटभर जेवू नये
6. तुम्ही तुमच्या आवडीचे परफ्यूम खोलीत फवारू शकता
7. झोपण्यापूर्वी पुस्तक वाचा
8. झोपण्यापूर्वी आंघोळ करायला विसरू नका
9. रूममध्ये सायलेंट म्युझिक लावू शकता.
10. झोपण्याच्या एक तास आधी मोबाईलपासून अंतर ठेवा.

सध्या दैनंदिन कामामुळे आणि सतत व्यस्त राहणाऱ्या जीवनशैलीमुळे आपण पूर्ण झोप घेत नाही किंबहुना अतिरिक्त झोप घेतो ह्या दोन्ही सवयी मुळे शरीरावर त्याचे वाईट परिणाम होत आहेत. माणसाला पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. आपल्याला नेहमी सांगितले जाते की किमान 7-8 तास झोप घ्या. काही लोकांची समस्या अशी आहे की त्यांना नेहमी झोपावसं वाटतं. म्हणजेच पुरेशी झोप घेऊनही ते पुन्हा झोपू शकतात. काही लोकांना 10-12 तास झोपल्यानंतरही थकवा जाणवतो. असं का होतं, तुम्ही कधी विचार केला आहे का? चला या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

दिवसभर थकवा जाणवण्याची कारणे-
1. कामामुळे रात्री उशिरा झोपणे
2. 7-8 तासांची झोप न लागणे
3. निद्रानाश हे आरोग्याच्या स्थितीमुळे किंवा झोपण्याच्या विकारामुळे देखील होऊ शकते
4. खूप ताण घेणे
5. चहा किंवा कॉफीचे अतिसेवन
6. शारीरिक हालचाल कमी
7. दिवसभर सुस्त राहणे
8. ड्रग्ज, अल्कोहोल किंवा सिगारेटचा अतिवापर
9. लठ्ठपणा
10. मधुमेह

(वरील सर्व माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आम्ही याला कोणताही दुजोरा देत नाही. वरील कोणताही उपाय करण्याच्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Share This News
error: Content is protected !!