Neem Leaves

Neem Leaves : ‘या’ झाडाची पाने, सकाळी रिकाम्या पोटी खा, शुगर पूर्णपणे नष्ट होईल

521 0

आजकालच्या वाढत्या जीवनशैलीनुसार लोकांच्या आरोग्याच्या (Health) समस्या वाढताना दिसत आहेत. लोकांना पित्त, शुगर आणि बरेच आजार उद्भवतात. त्यातल्या त्यात शुगरचा (Sugar) त्रास लोकांना मोठ्या प्रमाणात जाणवत असतो. कडुलिंबाची पाने (Neem Leaves) कडू असली तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. कडुलिंबाच्या पानांमध्ये (Neem Leaves) अनेक औषधी गुणधर्म असतात, जे रोगांपासून बचाव करण्यासाठी प्रभावी ठरतात. आयुर्वेदातही (Ayurveda) कडुलिंबाच्या पानांना खूप महत्व आहे. कडुलिंबाची पाने डायबिटीज आणि त्वचा रोगांवर प्रभावी आहेत.

Control Diabetes : शुगर कंट्रोल करायची असेल तर ‘या’ गोष्टींचे करा सेवन

कडुलिंबाच्या पानांमध्ये (Neem Leaves) शक्तिशाली फ्लेव्होनॉइड्ससह अनेक औषधी गुणधर्म असतात, जे स्वादुपिंडाला उत्तेजित करतात. यामुळे ब्लड शुगर लेव्हल कमी होते. डायबिटीजचे रुग्ण कडुलिंबाच्या पानांचे नियमित सेवन करू शकतात. कडुलिंबाच्या पानांमुळे त्वचेचे अनेक आजार बरे होतात. निरोगी लोकही कडुलिंबाची पाने खाऊ शकतात. यामुळे आजारांचा धोका कमी होतो. ही पाने बारीक करून पावडर बनवता येते.

अचानक शुगर लेव्हल वाढली ? शुगर नियंत्रणात आणण्यासाठी आहेत काही घरगुती उपचार

‘या’ लोकांनी खाऊ नये कडुलिंबाची पाने
ज्या व्यक्ती शारीरिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, वृद्ध आणि लहान मुले यांनी कडुलिंबाची पाने (Neem Leaves) खाऊ नयेत. याशिवाय लो बीपीचे रुग्ण, शरीरदुखीचा त्रास असलेले आणि शस्त्रक्रिया झालेल्यांनी कडुलिंबाची पाने खाऊ नयेत.

Share This News
error: Content is protected !!