सध्या डायबिटीज (Control Diabetes) हा एक मोठा आजार बनला आहे. या आजराने बरेचजण त्रस्त आहेत. हा आजार झालेल्या लोकांची संपूर्ण जीवनशैलीच बदलून जाते. आहारातदेखील खूप बदल करावे लागतात. यामुळे डायबिटीज (Control Diabetes) रुग्ण खूप चिंतेत असतात. हि शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी काही घरगुती उपायांची माहिती आज आपण घेणार आहे.
1) धणे
डायबिटीज असल्यास तुम्ही धणे सेवन करू शकता. ते स्वादुपिंडाच्या पेशींना जास्त इन्सुलिन तयार करण्यास मदत करतात. याशिवाय धण्यांच्या सेवनाने शरीरातील रक्तातील शुगर काढून टाकण्यास मदत होते.
मुलांसाठी घरीच तयार करा ‘हि’ प्रोटीन पावडर; आरोग्य चांगले राहण्यास होईल मदत
2) दालचिनी
शुगर कंट्रोल करण्यासाठी तुम्ही दालचिनीचा वापर करू शकता. दालचिनी शरीरातील इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढवते आणि शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करते.
3) मेथीदाणे
शुगर कंट्रोल करण्यासाठी तुम्ही मेथीच्या दाण्याचे सेवन करू शकता. यामध्ये नैसर्गिक अमीनो अॅसिड फॉर-हायड्रॉक्सी आयसोलॅट असते, जे शरीराच्या पॅनक्रियाज आयलेट पेशींमध्ये ग्लुकोजद्वारे उत्तेजित इन्सुलिनचे प्रमाण वाढवते.
पोटाच्या तक्रारींवर रामबाण उपाय आले लिंबू पाचक
शुगरची समस्या कधी निर्माण होते?
जेव्हा शरीरात इंसुलिन योग्य प्रकारे तयार होत नाही, तेव्हा शुगरची (Control Diabetes) समस्या उद्भवते. त्यामुळे या आजारात ज्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते अशा पदार्थांचे सेवन करण्यास मनाई केली जाते.