Health Tips

Health Tips : पायाला मुंग्या आल्या तर चुकूनही करू नका दुर्लक्ष; नाहीतर उद्भवू शकतात ‘हे’ गंभीर आजार

527 0

अनेकदा आपल्याला एका जागेवर बसून पायात मुंग्या येतात. दीर्घकाळ एकाच स्थितीत बसल्यानंतर ही समस्या (Health Tips) जाणवू लागते. मात्र तुम्हाला हा त्रास सातत्याने जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. पायामध्ये सतत मुंग्या येण्याचा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर हे कोणत्या तरी त्रासाचं लक्षण असण्याची शक्यता आहे. पण ह्या मुंग्या का येतात? यामागची कारणे तुम्हाला माहित आहे? चला तर मग जाणून घेऊया ती कारणे कोणती आहेत ते?

व्हिटॅमिनची कमतरता
जर तुमच्या हात व पाय दोघांना ही मुंग्या येत असतील तर तुमच्यात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता आहे. तसंच त्यामुळे तुम्हाला थकलेले किंवा आळसवाणे वाटेल.

मधुमेह
रक्तातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण शरीरातील नसांसाठी विषारी ठरते व त्यामुळे हातापायांना मुंग्या येतात. मुंग्या येण्याबरोबरच तुम्हाला खूप भूक किंवा तहान लागत असेल तर डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या.

हायपरथायरॉईसम
थायरॉईड ग्रंथी निष्क्रीय असल्यास थकवा जाणवू लागतो, वजन वाढू लागते. त्याचबरोबर हातपायाला मुंग्या येतात. म्हणून हायपरथायरॉईसम आहे की नाही हे पाहण्यासाठी ब्लड टेस्ट करून घेणे आवश्यक आहे.

मानेची नस आखडणे
मानेची नस आखडली गेल्यास पाठीपासून पायापर्यंत किंवा मानेपासून हातापर्यंतच्या भागात मुंग्या येतात किंवा तो भाग दुखतो. चुकीच्या पद्धतीत बसल्यामुळे किंवा एखाद्या दुखापतीमुळे मानेची नस आखडली जाते.

Share This News
error: Content is protected !!