Health Tips

Health Tips : जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्याने होऊ शकते ‘हे’ नुकसान

610 0

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आरोग्यतज्ज्ञ अनेकदा अधिक पाणी पिण्याची शिफारस (Health Tips) करतात. दिवसभर शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त पाणी पिणं खूप फायदेशीर आहे. पण अशातच काहीजण पाणी पिताना त्यात लिंबाचा वापर करतात, लिंबाचा रस पिळलेलं पाणी पिण्यास पसंती दर्शवतात. लिंबू शरिरातील घाण काढण्याचं, शरीर डिटॉक्सिफाय करण्याचं काम जरी करत असलं, तरी यासोबत ते चरबी जाळण्यातचं काम देखील करतं. यामुळे तुमची लठ्ठपणापासून सुटका तर होईलच. पण कोणत्याही गोष्टीचा अतिवापर तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. लिंबू पाण्याचं अतिसेवन शरिरासाठी घातक देखील ठरू शकतं. कसे ते आज आपण जाणून घेणार आहेत …

जास्त लिंबू पाणी प्यायल्यानं होणारं नुकसान
जास्त लिंबू पाणी प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते.
लिंबू पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने पेप्टिक अल्सरचा धोका वाढतो.
पाणी पिताना त्यासोबत लिंबू पिळल्यास शरीर डिहाईड्रेट देखील होऊ शकतं.
जास्त लिंबी पाणी प्यायल्याने वजन कमी होऊ शकतं.
जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्याने शरीरात लोहाची कमतरता भासू शकते.
पचनसंस्थेत अडथळे येऊ शकतात.
लिंबू पाणी जास्त प्यायल्याने हाडं कमजोर होतात.

नेमकं किती ग्लास लिंबू पाणी पिणं योग्य?
लिंबू पाण्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. पण जास्त लिंबू पाणी पिणं शरीरासाठी हानिकारक असू शकतं. दररोज केवळ एक ग्लास लिंबू पाणी पित असाल तर ते योग्य आहे. परंतु एकपेक्षा जास्त ग्लास लिंबू पाणी पिणं टाळलं पाहिजे.

Share This News
error: Content is protected !!