Health Tips

Health Tips : जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्याने होऊ शकते ‘हे’ नुकसान

531 0

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आरोग्यतज्ज्ञ अनेकदा अधिक पाणी पिण्याची शिफारस (Health Tips) करतात. दिवसभर शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त पाणी पिणं खूप फायदेशीर आहे. पण अशातच काहीजण पाणी पिताना त्यात लिंबाचा वापर करतात, लिंबाचा रस पिळलेलं पाणी पिण्यास पसंती दर्शवतात. लिंबू शरिरातील घाण काढण्याचं, शरीर डिटॉक्सिफाय करण्याचं काम जरी करत असलं, तरी यासोबत ते चरबी जाळण्यातचं काम देखील करतं. यामुळे तुमची लठ्ठपणापासून सुटका तर होईलच. पण कोणत्याही गोष्टीचा अतिवापर तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. लिंबू पाण्याचं अतिसेवन शरिरासाठी घातक देखील ठरू शकतं. कसे ते आज आपण जाणून घेणार आहेत …

जास्त लिंबू पाणी प्यायल्यानं होणारं नुकसान
जास्त लिंबू पाणी प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते.
लिंबू पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने पेप्टिक अल्सरचा धोका वाढतो.
पाणी पिताना त्यासोबत लिंबू पिळल्यास शरीर डिहाईड्रेट देखील होऊ शकतं.
जास्त लिंबी पाणी प्यायल्याने वजन कमी होऊ शकतं.
जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्याने शरीरात लोहाची कमतरता भासू शकते.
पचनसंस्थेत अडथळे येऊ शकतात.
लिंबू पाणी जास्त प्यायल्याने हाडं कमजोर होतात.

नेमकं किती ग्लास लिंबू पाणी पिणं योग्य?
लिंबू पाण्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. पण जास्त लिंबू पाणी पिणं शरीरासाठी हानिकारक असू शकतं. दररोज केवळ एक ग्लास लिंबू पाणी पित असाल तर ते योग्य आहे. परंतु एकपेक्षा जास्त ग्लास लिंबू पाणी पिणं टाळलं पाहिजे.

Share This News

Related Post

गवतावर चालणे : रोज अनवाणी गवतावर चालल्याने मिळेल अनेक आजारांपासून मुक्ती, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Posted by - March 15, 2023 0
सतत बिघडत चाललेल्या जीवनशैलीमुळे आजकाल लोक अनेक समस्यांना बळी पडत आहेत. याशिवाय बिझी शेड्युलमुळे लोकांच्या शारीरिक हालचालीही लक्षणीय रित्या कमी…

उन्हाळ्याच्या दिवसांत नारळपाणी फायद्याचे ; काय आहेत फायदे जाणून घ्या

Posted by - April 22, 2022 0
उन्हापासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात. उष्णतेपासून बचावासाठी विविध प्रकारची शीतपेये घेतली जातात. कार्बोनेटेड पेये, फळांचे रस, आमरस, लस्सी…
Bournvita

Bournvita : बोर्नव्हिटाला हेल्थ ड्रिंक प्रकारातून काढून टाकावे; सरकारने ई कॉमर्स कंपन्यांना दिले आदेश

Posted by - April 13, 2024 0
मुंबई : मुलांच्या वाढीस चालना देण्यासाठी बाजारात बोर्नविटा (Bournvita) सारखी अनेक आरोग्य पेये उपलब्ध आहेत, परंतु अशी पेये आणि ज्यूस…

मानसिक आरोग्य : अल्पवयीन मुलांवरील वाढते बलात्कार ; पालकांसोबत संवाद अधिक महत्त्वाचा…!

Posted by - July 18, 2022 0
पुण्यामध्ये आज कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पुन्हा एकदा शाळेच्या बस चालकाने दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *