Headache Tips

Headache Tips : वारंवार होते डोकेदुखी? ‘या’ जीवनसत्वाची असू शकते कमी

602 0

काही लोक अनेकदा डोकेदुखीची तक्रार करत असतात. काहींना संध्याकाळी डोकेदुखीचा (Headache Tips) त्रास सुरू होतो तर काहींना सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखी होते. कधीकधी ही डोकेदुखी इतकी वाढते की, ती एका आजाराचे रूप घेते ज्याला आपण मायग्रेन म्हणतो. नेमका हा आजार कशामुळे होतो? याबद्दल आपण आज जाणून घेणार आहे…

‘या’ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वारंवार होते डोकेदुखी
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होते. वास्तविक, व्हिटॅमिन ‘डी’ चा मेंदूचे कार्य आणि मज्जातंतूंच्या कार्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला वेळोवेळी डोकेदुखीचा त्रास होऊ लागतो. यामुळे प्रथम मेंदूच्या आत सूज येते आणि नंतर तुमच्या न्यूरॉन्सवर परिणाम होतो.

मायग्रेनची मूलभूत लक्षणे जाणून घ्या
उलटीसारखे होणे
सतत भीती वाटत राहणे
भूक न लागणे
डोकेदुखी होणे
डोळ्यासमोर अंधारी येऊन चक्कर येणे
डोकं सतत एकाच बाजूने ठणकत राहणे
कोणत्याही गोष्टीने लवकर थकायला होणे
अति प्रकाश, मोठा आवाज आणि कोणताही तीव्र गंध सहन न होणे
सतत मूड बदलत राहणे
अंगाला सतत खाज येणे
सतत उलटीसारखे आणि मळमळ होणे
बधीरता येणे आणि असह्य डोकेदुखी सतत होत राहणे

व्हिटॅमिन डी साठी यांचा आहारात करा समावेश
चीज
अंडी
मासे
दूध
सोयाबिन
संत्र्याचा रस
मशरूम

Share This News
error: Content is protected !!