नवी दिल्ली: अनेकजण जिममध्ये जाऊन वेटलिफ्टिंग करतात. यातील काहीजण हे खूपच फिटनेस फ्रिक (Fitness Trainer) असतात. याच उत्साहाच्या भरात अधिक वजन उचलतात आणि आपल्या जीवानिशी मुकतात. असाच निष्काळजीपणा फिटनेस इन्फ्लूएन्सर जस्टिन विक्कीला नडला (Fitness Trainer) आहे. जस्टिन विक्कीचा इंडोनेशियामध्ये 15 जुलै रोजी जिममध्ये खांद्यावरून वजन उचलताना मृत्यू झाला.त्याच्या मृत्यूचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
काय घडले नेमके?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये जस्टिन विकी ट्रेनरच्या मदतीने बारबेल उचलत असताना बारबेलचा तोल त्याच्या मानेवर पडून त्याची मान तुटल्याचे दिसत आहे.जेव्हा त्याला दुखापत झाली तेव्हा तो उभा राहू शकत नव्हता. जेव्हा तो जखमी झाला तेव्हा त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या मानेवर जोरात आघात झाल्याने त्याच्या हृदय आणि फुफ्फुसांना जोडणाऱ्या महत्वाच्या नसा गंभीरपणे संकुचित झाल्या होत्या. त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली मात्र तरीदेखील त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
MNS Worker : अमित ठाकरेंचा ताफा अडवल्याने संतप्त कार्यकर्त्यांकडून टोलनाक्याची तोडफोड
This was brutal.
No safety rack.
Not enough spotters.
400 pounds.Neck broke.
Internal decapitation.RIP #justynvicky
— Mahesh Nair (@MaheshNairNY) July 22, 2023
फिटनेस इन्फ्लूएन्सर जस्टिन विक्कीचे (Fitness Trainer) इंस्टाग्रामवर जवळपास 30,000 फॉलोअर्स आहेत. एका फॉलोअरने लिहिले की तो नेहमी सकारात्मकतेने भरलेला असतो आणि मला प्रेरणा देत असे. माझ्या फिटनेस प्रवासावर त्याचा प्रभाव मी कधीही विसरणार नाही. हे आमच्यासाठी खूप मोठे नुकसान आहे, परंतु आम्ही त्याला आमच्यात जिवंत ठेवू.