Menstrual Cycle : महिन्याच्या ‘त्या’ चार दिवसात अशी घ्यावी काळजी ; Irritation आणि Pain नक्कीच होईल कमी…

217 0

पाळी संदर्भात महिलांनाच अद्याप देखील अनेक समज गैरसमज आहेत. मुळात जर महिलांनाच आपली मानसिकता बदलायची नसेल तर कठीण आहे. पण ज्या पाळीमुळे स्त्री माता होऊ शकते ते दिवस अपवित्र कसे असू शकतात ? अर्थात हा ज्याचा त्याच्या भावनेचा प्रश्न आहे . परंतु या दिवसांमध्ये होणारी चिडचिड, इरिटेशन आणि त्रास कमी करण्यासाठी काही सवयी लावून घ्या . यामुळे त्रास तर नक्कीच कमी होईल , परंतु भविष्यातील मोठमोठे आजार देखील होण्याची शक्यता कमी राहील .

१. तुम्हाला कोणते सॅनिटरी पॅड सूट करते हे तपासून पहा. दर सहा तासाला हे पॅड बदलायचे आहे. हे नेहमी ध्यानात ठेवा तुमचा ब्लड फ्लो जर अधिक असेल तर गरजेनुसार लवकरात लवकर पॅड बदला . तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी होणाऱ्या ब्लड फ्लो कमी असतो , त्यानुसार जास्तीत जास्त सहा तास सॅनिटरी पॅड वापरा त्यानंतर ते बदलणे आवश्यक आहे .
२. सॅनिटरी पॅड ऐवजी तुम्ही जर इतर पर्याय निवडत असाल तर योग्य हायजिनची देखील काळजी घ्या . कप वापरताना त्या कपची योग्य स्वच्छता वेळोवेळी करणे आवश्यक आहे .
३. कपड्याचा वापर करत असाल तर देखील तो कपडा योग्य वेळेमध्ये बदला आणि त्या कपड्याचा हायजिन राखण सर्वात कठीण आहे . त्यामुळे कपडा वापरण्यापेक्षा सॅनिटरी पॅडचाच वापर योग्य ठरतो .
४. सामान्य दिवशी ज्या इनर गारमेंट्सचा तुम्ही वापर करता त्यापेक्षा या दिवसांमध्ये वापरायचे इनर गारमेंट्स वेगळे ठेवा. जे कॉटनचे असावेत. त्यांचा हायजिन अधिक राखावा . हे इनर गारमेंट डेटॉलने स्वच्छ धुऊन ते चार दिवसच वापरत रहा .
५. पोटाचे दुखणे जर अधिक वाटत असेल तर ओटी पोटावर केवळ शेकावे.
६. पोट दुखी किंवा अंगदुखी खूपच जास्त असेल तर थेट कोणतीही गोळी घेण्यापेक्षा वैद्यकीय सल्लाचं घ्यावा.
७. भरपूर पाणी प्या
८. आणि सर्वात महत्त्वाचे मोकळेपणाने बोला , यात काहीही गैर नाही . ही केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

Share This News

Related Post

HEALTH TIPS : प्रेग्नेंसीमध्ये गुळ-पापडीचे लाडू आहेत वरदान ; हिमोग्लोबिनची राहणार नाही कमतरता ( Recipe )

Posted by - July 30, 2022 0
HEALTH TIPS : प्रेग्नेंसीमध्ये अनेक महिला शरीरातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेची अनेक वेळा तक्रार करतात. त्यामुळे चक्कर येणे, थकवा जाणवणे अशा गोष्टी…
Underweight Health Issues

Underweight Health Issues : सडपातळ असणे होऊ शकते अतिशय धोकादायक ‘या’ 5 आजाराचा वाढू शकतो धोका

Posted by - August 14, 2023 0
वाढता लठ्ठपणा ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण अतिप्रमाणात सडपातळ (Underweight Health Issues) असणेदेखील धोकादायक ठरु शकते. या स्थितीत (Underweight…

उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे होणारे आजार कोणते..? जाणून घ्या

Posted by - March 21, 2022 0
1) उष्माघात – मानवी शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते त्यापेक्षाही वातावरणातील तापमान वाढलेले असते. पुण्यात कमाल तापमान चाळिशीच्या…

#HEALTH : लेमनग्रास शरीराला देऊ शकतात अनेक फायदे, गुणधर्म जाणून घ्या तुम्ही आजपासूनच त्याचे सेवन सुरू कराल

Posted by - February 20, 2023 0
#HEALTH : लेमनग्रास ही एक सुगंधी औषधी वनस्पती आहे जी आजच्या ट्रेंडिंग जीवनशैलीच्या सवयींचा एक भाग बनत आहे. लेमन ग्रासचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *