Periods Pain

Period Pain Relief : मासिक पाळीदरम्यान होणारी पोटदुखी काही क्षणात होईल बंद; फक्त ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

344 0

मासिक पाळीच्या दिवसात महिलांना पोटदुखी, पाठदुखी, चिडचिड, मायग्रेन अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. काही महिलांना या वेदना खूप कमी प्रमाणात जाणवतात, तर काही महिलांना मासिक पाळी दरम्यान असह्य करणाऱ्या वेदना होतात. यामुळे या वेदना कमी होण्यासाठी काही महिला नेक गोळ्या औषधांचे सेवन करतात, पण यामुळे त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे ज्याचा तुम्ही आहारात उपयोग केला तर मासिक पाळीपासून होणाऱ्या वेदना कमी होणार आहेत.

Ginger water: Benefits, risks, and how to make it at home

1) आलं : तज्ञांच्या म्हणण्यानुसार मासिक पाळी दरम्यान दररोज कोमट आल्याचे पाणी प्यायल्याने वेदना, सूज , क्रॅम्प्स येण्यापासून तुम्हाला आराम मिळू शकतो. हे आल्याचे पाणी मासिक पाळीच्या दिवसात प्रभावी ठरू शकते.

How Pineapples Can Help Your Skin and Hair

2) अननस : अननसमध्ये ब्रोमेलेन एंजाइम असते जे मासिक पाळीच्या दरम्यान ब्लोटिंग आणि ओटीपोटात क्रॅम्पच्या समस्यांशी लढा देऊन आराम करण्यास मदत करते.

Lemon

3) लिंबू : मासिक पाळीच्या काळात अनेक वेळा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने महिलांच्या शरीरात रक्ताची कमतरता भासते. तेव्हा, लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड अन्नातील लोहाचे शोषण वाढवण्यास मदत करते. तसेच या काळात लिंबाचे सेवन केल्याने चिडचिडेपणा आणि मूड स्विंग यांसारख्या समस्या कमी होतात.

कलिंगड आणि टरबुजाला "अच्छे दिन"; भावात तब्बल इतकी वाढ

4) कलिंगड : कलिंगडमध्ये लाइकोपीन नावाचे प्लांट कंपाउंड असते, जे शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते.

9 Impressive Health Benefits of Beets

5) बीट : मासिक पाळीत रक्तस्त्राव झाल्यास स्त्रीच्या शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. त्यामुळे महिलांच्या शरीरात लोहाची कमतरता होते आणि शरीर सुस्त होऊ लागते. त्यामुळे या काळात बीटचे सेवन केल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.

6) डार्क चॉकलेट : डार्क चॉकलेट खाल्याने मासिक पाळीत होणारा त्रास दूर होतो.

) काळे मनुके : या काळ्या मनुक्यांचे सेवन करावे. यामुळे होणारा त्रास कमी होतो.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!