Hair Pack

केसांची हरवलेली चमक परत आणायची असेल तर कॉफी पावडर हेअर पॅक नक्की ट्राय करा

151 0

तुमचे सौंदर्य वाढवण्यात केसांची महत्वाची भुमिका असते. पण उन्हाळ्यात धूळ, घाम आणि कडक उन इत्यादींमुळे केस खराब होतात आणि त्यांची शाईन निघून जाते. यानंतर तुम्ही ती परत आणण्यासाठी सलूनमध्ये जाऊन हेअर स्पा किंवा केराटीन ट्रीटमेंट करता. यामध्ये तुमचे पैसे खर्च होतात. तर आज आम्ही तुम्हाला केसांना रेशमी आणि चमकदार बनवण्यासाठी कॉफी पावडर हेअर पॅकबद्दल सांगणार आहे. जो तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरेल. हा हेअर पॅक तुमचे केस रेशमी आणि चमकदार तर बनवतोच, पण कोंडा आणि अवेळी पांढऱ्या केसांपासून देखील मुक्त होण्यास मदत करतो.

कॉफी पावडर हेअर पॅक कसा बनवायचा?
दोन चमचा एरंडेल तेल (Castor oil) आणि एक चमचा कॉफी पावडर या दोन गोष्टींचा वापर करून तुम्ही हा हेअर पॅक बनवू शकता. त्यासाठी सर्वप्रथम एका वाडग्यात एक चमचा कॉफी पावडर आणि 2 चमचे एरंडेल तेल घ्या. यानंतर या दोन्ही गोष्टी नीट मिसळून घ्या. झाला तुमचा हेअर पॅक.

कॉफी पावडर हेअर पॅक कसा वापराल?
कॉफी पावडर हेअर पॅक (Coffee Powder Hair Pack) केसांना लावण्यापूर्वी केस ओले करा. त्यानंतर तयार केलेला पॅक केसांना लावून घ्या. अर्धा तास हा हेअर पॅक केसांवर तसाच राहू द्या. त्यानंतर तुम्ही शॅम्पूच्या मदतीने केस (Hair) धुवा. हा हेअर पॅक आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापर म्हणजे तुमचे केस रेशमी आणि चमकदार बनतील. हा हेअर पॅक घरच्या घरी बनवल्यामुळे तुमचा वेळ पैसा दोन्ही वाचणार आहेत.

Share This News

Related Post

HEALTH WEALTH : ‘ या ‘ सोप्या उपायांनी डोळ्यांचे आरोग्य आणि सौंदर्य राखा अबाधित

Posted by - September 1, 2022 0
हे सुंदर जग अनुभवण्यासाठी , पाहण्यासाठी निसर्गाने दिलेला सुंदर अवयव म्हणजेच डोळे आहेत . डोळ्यांचा रंग कोणताही असू द्या परंतु…

BEAUTY TIPS : अंडरआर्म्स आणि हाताच्या कोपरांवरील काळपटपणा दूर करा; सोपा घरगुती उपाय

Posted by - November 9, 2022 0
हाताचे कोपर आणि अंडरआर्म्समध्ये अनेकींना रंग गडद असल्याची लाज वाटते. खरंतर हाताच्या कोपऱ्यांचा रंग गडद होणं, हे नैसर्गिक आहे पण…
Bath In Bathroom

Health Tips : बाथरूममधील ‘या’ 5 गोष्टी आरोग्यासाठी ठरू शकतात घातक

Posted by - July 17, 2023 0
बाथरूममध्ये वापरल्या जाणार्‍या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे. कधी कधी या गोष्टी (Health Tips) आपल्यासाठी घातक ठरतात. त्यामुळे या…
Hairfall

Hairfall Remedies: पावसाळ्यात खुप केस गळतात? मग ‘हे’ उपाय ट्राय करा केस गळतीपासून होईल सुटका

Posted by - July 16, 2023 0
पावसाळ्यात केस गळण्याची (Hairfall Remedies) समस्या अनेकांना भेडसावत असते. कारण हवेतील आर्द्रता टाळूला तेलकट बनवते, त्यामुळे केस चिकट होतात, त्यामुळे…

BEAUTY TIPS : नख वाढत नाहीत.. वाढल्यावर सहज तुटतात.. नखांच्या आरोग्यासाठी करा हे सोपे उपाय !

Posted by - December 21, 2022 0
BEAUTY TIPS : प्रत्येक तरुणीच तिच्या सौंदर्याकडे विशेष लक्ष असतं हात आणि पायाची नको ही मोठी सुंदर दिसावी यासाठी आज…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *