पावसाळ्यामध्ये घरात माश्या , चिलटे येणे सामान्य आहे . पण या चिलट्यांमुळे घरात खूपच अस्वच्छ आणि अनहायजेनिक वाटत राहते. पण मग अशावेळी या चिलट्यांना घराच्या बाहेर ठेवण्यासाठी काय करावे ? हे आज आपण पाहणार आहोत.
तर सर्वात प्रथम पावसाळ्यामध्ये घरात सातत्याने ओल राहिल्यामुळे असे बारीक कीटक आणि जीव जंतूंची उत्पत्ती अधिक होत असते. यासाठी घर होईल तितके कोरडे आणि हवेशीर ठेवण्याचा प्रयत्न करा.
- घरामध्ये हवा खेळती राहील याची काळजी घ्या. जमेल तेव्हा खिडकी दरवाजे उघडे ठेवा.
- घर पुसताना त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि चांगल्या प्रतीचे फिनाईल अवश्य वापरा . विशिष्ट वासामुळे घरात कीटक येणं कमी होतं.
- घरात अन्नपदार्थ उघडे किंवा खराब अन्नपदार्थ तात्काळ कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून योग्य विल्हेवाट लावावी.
- दिवसातून दोन वेळा घराचे खिडकी दरवाजे पूर्ण बंद करून दोन ते तीन कापूर आणि त्यावर दोन लवंगा ठेवून जाळाव्यात . यामुळे चिलटे तात्काळ दूर होतील त्यानंतर खिडकी दरवाजे तुम्ही पुन्हा उघडू शकता.
- तवा तापवून त्यावर ओवा टाकावा . ओवा भाजला गेल्यानंतर त्यामधून येणाऱ्या वासाने चिलटे आणि माशा दूर राहतात.
- कडुलिंबाचा पाला आणि कापूर एकत्र जाळल्याने देखील चिलटे आणि माशांपासून सुटका मिळू शकते.