पुणे : बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्याआधी सकाळी अकरा वाजता बोर्डाने पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल 93.37 % इतका लागला असल्याचे जाहीर केले. तसेच 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती बोर्डाने दिली. बोर्डाची परीक्षा ९ विभागीय मंडळात झाली. दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी 94.20 टक्के इतकी आहे. तर सरासरी टक्केवारी 91.87 टक्के इतकी आहे. कोकण विभागाने पुन्हा बाजी मारली असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.
बारावीच्या निकालात यंदाही मुलींनीच बाजी मारलीय. यंदा बारावीच्या निकालाचा टक्का वाढला असल्याची माहिती बोर्डाने दिली. बारावीच्या परीक्षेला राज्यात 15 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दुपारी एक वाजता सहा संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची प्रिंट काढता येणार आहे.
निकालाची वैशिष्ट्ये
1. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण 14,33,371 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,23,970 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 13,29,684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी 93.37 आहे.
2. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 45,448 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 45,083 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 22,463 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 49.82आहे.
3. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 41,362 एवढी असून त्यापैकी 40,795 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 34,988 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी 85.76 आहे.
4. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 7032 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6986 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 6581 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 94.20 आहे.
5. इ.12 वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
6. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (97.51%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (91.95 %) आहे.
7-. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल 95.44 % असून मुलांचा निकाल 91.60 % आहे. म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.84 % ने जास्त आहे.
विभागनिहाय निकाल
कोकण 97.51 सर्वात जास्त
नाशिक 94.71
पुणे 94.44
कोल्हापूर 94.24
छत्रपती संभाजीनगर 94.08
अमरावती 93
लातूर 92.36
नागपूर 92.12
मुंबई 91.95 सर्वात कमी
या वेबसाईटवर पाहू शकता निकाल
mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://result.digilocker.gov.in
http://results.targetpublications.org
कसा पाहणार बारावीचा निकाल
mahresult.nic.in या ऑफिसिअल वेबसाइटवर विद्यार्थी 12वी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2024 ऑनलाइन पाहू शकतील. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून, विद्यार्थी इयत्ता 12वी साठी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 2024 पाहू शकतात.
mahresult.nic.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
मेन पेजवर ‘महाराष्ट्र एचएससी निकाल 2024’ साठी असलेल्या लिंकवर क्लिक करा.
दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
सबमिट करण्यासाठी ‘निकाल पाहा’ बटणावर क्लिक करा.
2024 मध्ये तुम्हाला mahresult.nic.inवर 12वीचा निकाल मिळेल.
तुमच्याकडे निकाल प्रिंट करण्याचा किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेण्याचा पर्याय सुद्धा आहे.
SMS द्वारे पाहू शकता निकाल
खाली दिलेला एसएमएस फॉरमॅट टाइप करून विद्यार्थी महाराष्ट्र 12वीचा निकाल 2024 एसएमएसद्वारे पाहू शकतात. महाराष्ट्र बोर्डाचा 12 वीचा निकाल 2024 पाहण्यासाठी दिलेल्या स्टेप फॉलो करा.
1) मॅसेजमध्ये MHHSCSEAT NO. टाईप करा.
2) यानंतर 57766 या नंबरवर हा मॅसेज सेंड करा.
3) यानंतर तुम्हाला मॅसेजच्या माध्यमातून आपला निकाल मिळेल.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात आज कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट
Pune Porsche Accident: ‘वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली’; अल्पवयीन आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड
Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक
 
                         
                                 
                             
                             
                             
                            