मुंबई : विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा या ठिकाणी लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्रप्रमुख या पदांसाठी ही भरती (Recruitment) प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 15 जून 2023 असणार आहे. चला तर मग या जाणून घेऊया या भरतीचा तपशील….
‘या’ जागांसाठी भरती
केंद्रप्रमुख (Cluster Head)
एकूण जागा – 2,384
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
केंद्रप्रमुख (Cluster Head)
फक्त संबंधित जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, न.प./ न. पा., म.न.पा., खाजगी संस्था मधील शिक्षक कर्मचाऱ्यांना प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करता येणार नाही.
जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची बी.ए./ बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण करणे आवश्यक आहे. किंवा प्रशिक्षित शिक्षक (प्राथमिक) या पदावर नियुक्त शिक्षकांनी ज्या दिनांकास वरील प्रमाणे पदवी धारण केलेली आहे. त्या दिनांकापासून 3 वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.
एवढा मिळणार पगार
केंद्रप्रमुख (Cluster Head) – 41,800 – 1,32,300 रुपये प्रतिमहिना
कोणकोणती कागदपत्रे आहेत आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/mscepapr23/ या लिंकवर क्लिक करा.
या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा