पुणे: विद्येचा माहेरघर अशी ओळख असणारा पुणे आता गुन्हेगारांचा अड्डा बनलाय का असा प्रश्न पडावा अशा गुन्हेगारीच्या घटना मागच्या अनेक दिवसापासून पुणे शहरात घडत असून आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक माणुसकीला काळीमा फासणारी आणि विकृतीचा कळस गाठणारी घटना उघडकीस आली आहे.
पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयामध्ये शिकत असणाऱ्या तरुणीवर महाविद्यालयातीलच चार नराधमांनी बलात्कार केला. आणि तिचे व्हिडिओ तयार केले. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना पोलिसांनी अटकही केली आहे या प्रकरणातील दोन जण अल्पवयीन आहेत.
स्वप्निल विलास देवकर आणि ओम आदेश घोलप अशी अटक करण्यात आलेल्या नराधमांची नाव असून या प्रकरणातील धक्कादायक माहिती अशी समोर आली आहे की या नराधमांनी या मुलीचे नग्नावस्थेतील फोटोज आणि व्हिडिओज इंस्टाग्राम वर टाकले होते यामुळे ही तरुणी नैराश्यात गेली आणि हेच व्हिडिओ अन्यत्र व्हायरल करण्याची धमकी देत या तिच्यावर अत्याचार केले.
आरोपींवर कठोर कारवाई करावी?
दरम्यान ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे याबरोबरच राज्याचे गृहमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी घटनेकडे गांभीर्याने पहात आरोपींना कठोरातल कठोर शासन करावं जेणेकरून पुन्हा असं कृत्य होणार नाही अशी मागणी केली आहे.