नवी दिल्ली: मागील अनेक दिवसापासून राष्ट्रीय राजकारणामध्ये भाजपाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार या चर्चांना उधाण आल्या आहेत भाजपाचे विद्यमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची केद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतरच भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बदलाच्या चर्चा रंगल्या होत्या.
राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, सुनील बंसल, तरुण चुंग, केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान,धर्मेंद्र प्रधान आधी नेत्यांची नावे चर्चेत आले होते नुकतंच काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा ही राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी झाली होती.
मात्र अशातच आता राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी भाजपकडून एका बड्या महिला नेत्याचं नाव चर्चेत आलं असून हे नाव आहे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचं. वसुंधरा राजे यांनी 2003 ते 2008 आणि 2013 ते 2018 या कार्यकाळात राजस्थानचे मुख्यमंत्री पद सांभाळलं असून भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही वसुंधरा राजे यांनी काम पाहिला आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या निवासस्थानी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती या बैठकीमध्ये भाजपाचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष महिला अथवा ओबीसी असावा असं संघाकडून सांगण्यात आलं होतं या पार्श्वभूमीवरच वसुंधरा राजे यांचं नाव चर्चेत झाल्याची माहिती मिळाली आहे.