वाशिम : रविवारी वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली. यामध्ये रिसोड व मालेगाव तालुक्यात शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
यादरम्यान मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली. यामध्ये शेतकरी निवास गोविंदा कदम त्याचे वडील गोविंदा राजाराम कदम हे दोघे शेतामध्ये आंबे तोडण्यासाठी गेले होते.
यादरम्यान अचानक त्या ठिकाणी वीज कोसळली आणि गोविंदा कदम यांचा जागीच मृत्यू झाला तर वडील गोविंदा कदम हे गंभीर जखमी झाले.
 
                         
                                 
                             
                             
                             
                            