वाई : साताऱ्यातील वाई तालुक्यात (Wai Viral Video) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या वादावरून वाई शहरात जोरदार मारामारी झाली. या मारहाणीत आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 4 महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या मारहाण प्रकणावरून पोलीस ठाण्याच्या आवारात दिवसभर वातावरण तणावपूर्ण होते.
वाई सातारा रस्त्यावर यशवंतनगर गावच्या हद्दीत मानकुंबरे वस्तीवर जाण्याच्या येण्याच्या रस्त्यावरून शामराव मानकुंबरे व मोहन जाधव या दोन लगतदारांमध्ये पूर्वी पासून वाद आहेत. रस्त्यावरून त्या दोघांमध्ये न्यायालयात खटला सुरू आहे .मोहन जाधव यांनी नुकतीच मानकुंबरे वस्तीलगत जागा खरेदी केली आहे. त्याला जाण्या येण्याचा रस्ता नाही .त्यामुळे ते मानकुबरे यांच्या मालकीच्या रस्त्यावरूनच जाणे येणे करत होते. आज सकाळी मोहन जाधव यांनी आपल्या जागेमध्ये बोअर घेण्यासाठी वाहन मागवले होते .वाहन आत घेऊन जाण्यासाठी त्यांनी मानकुंबरे यांना गेट उघडण्यास सांगितले. मात्र या गेटमधून संबंधित गाडी आज जाणार नव्हती. त्यामुळे मानकुबरेनी या गाडीला आत जाण्यास विरोध केला. यावरून दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्याचे मारामारीत रूपांतर झाले. मारहाणीत मोहन जाधव यांच्या बरोबरीच्या अकरा जणांनी मानकुबंरे यांच्या घरातील आठ पुरुष व महिलांना लोखंडी रॉड लाकडी दाडक्यांनी,जोरदार मारहाण केली. तसेच गाडयांच्या काचा फोडून गाड्यांचेही नुकसान केले.
रस्त्याच्या वादावरून वाईत जोरदार मारामारी; 8 जण गंभीर जखमी pic.twitter.com/ONuY7SVi2K
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) November 9, 2023
यामध्ये मानकुंबरे यांच्या कुटुंबातील शामराव मानकुंबरे संदीप मानकुंबरे रेखा संतोष मानकुंबरे भाग्यश्री मानकुंबरे गणेश मानकुंबरे सोनाली मानकुबंरे व कलावती मानकुबरे या गंभीर जखमी झाल्या .त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात मोहन सावकार जाधव सावकार किरण घाडगे,रॉकी घाडगें सह सदाशिव जाधव लखन जाधव पवन उर्फ पांग्या जाधव सचिन जाधव उज्वला मोहन जाधव प्रिया उर्फ प्रिया लखन जाधव राधा जाधव काजल सचिन जाधव अशा अकरा जणांवर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन लोकांना ताब्यात घेतले आहे. सध्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बिपिन चव्हाण या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Gadchiroli News : घातपात कि अपघात ? बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा अचानक आढळला मृतदेह
Satara News : साताऱ्यात भीषण अपघात ! पोलिसांच्या गाडीने चौघांना उडवलं
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.