नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येक घरामध्ये छोटे- मोठे वाद होत असतात. मात्र काहीवेळा हे वाद विकोपाला जातात आणि एक वेगळेच वळण घेतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक कौटुंबिक कलहाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. यामध्ये एक सून आपल्या सासऱ्याला भररस्त्यात मारहाण करताना दिसत आहे. एवढचं नाहीतर ती सासऱ्यांना रस्त्यावर पळवून पळवून हाणताना दिसत आहे. सध्या या मारहाणीचा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हिडिओमध्ये हिरवी सलवार घातलेली एक महिला हातात लोखंडी पाईप घेऊन उभा असलेली दिसत आहे. तिच्या हावभावावरून असं जाणवतं की, ती महिला एका वृद्ध पुरुषावर ओरडत आहे तर दुसरी स्त्री आणि एक पुरुष तिला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही वेळाने संतापलेली महिला पुढे सरकते, तर दुसरी महिला त्या वृद्धाला वाचवण्याचा प्रयत्न करते. दरम्यान, संतापलेल्या महिलेनं वृद्धाला पाईपने मारण्याचा प्रयत्न केला. पण, दुसरी महिला त्या दोघांच्या मध्ये पडून वृद्धाला वाचवताना दिसत आहे.
Viral Video : दोन तरूणांनी घोड्याला जबरदस्ती पाजली सिगारेट; केदारनाथमधील संतापजनक घटना
https://twitter.com/ShoneeKapoor/status/1676098767236526080
यानंतर अचानक वृद्ध व्यक्ती तिथून पळून जाऊ लागतो. हे पाहताच महिला रस्त्यावरच त्याचा पाठलाग करू लागते. व्हिडिओच्या शेवटी जखमी व्यक्ती खुर्चीवर बसलेला पाहायला मिळतो. Shonee Kapoor या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर (Viral Video) करण्यात आला आहे. महिलेनं सासऱ्याचा पाठलाग करून त्याला लोखंडी पाईपने मारहाण केली आणि या हल्ल्यात तो जखमी झाला असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे. एवढंच नाहीतर वृद्धाला वाचवण्यासाठी आलेल्या मोलकरीणीलाही या महिलेने मारहाण केली आहे.