akola

Akola Violence: वादग्रस्त पोस्टवरून अकोल्यात दोन गटात तुफान राडा; कलम 144 लागू (Video)

433 0

अकोला : अकोला शहरातील जूने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रात्री दोन गटांमध्ये तुफान राडा होऊन दगडफेक करण्यात आली आहे. दोन गटात झालेल्या या तुफान दगडफेक आणि दंगलीमध्ये एकाचा मृत्यू तर चार ते पाच जण यामध्ये गंभीर जखमी झाले. या दोन्ही गटांकडून अनेक वाहनांची तोडफोड तसेच जाळपोळ करण्यात आली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दंगलीतील अनेक लोकांना अटक करण्यात आली असून आता परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलं आहे. तसेच कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं अकोला पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले.

काय आहे नेमके प्रकरण?
अकोल्यात एका सोशल मीडिया ग्रुपवर एक पोस्ट (Controversial Post) आली. त्यामुळे वाद झाला आणि शेकडो लोक रस्त्यावर उतरले या लोकांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. काही तरुणांनी बाईक, गाड्या आणि दिसेल त्या ठिकाणी आगी लावत प्रचंड जाळपोळ केली. त्यामुळे अकोल्यात अधिकच तणाव पेटला. रात्री उशिरा हा प्रकार घडल्याने सामान्य लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात घबराट निर्माण झाली होती.

144 कलम लागू
अकोल्यात झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात कलम 144 (Section 144) लागू करण्यात आलं आहे. लोकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. घोळक्यांनी उभे राहण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी आणखी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!