पुणे : सांस्कृतिक राजधानी असलेली पुण्यनगरी आता पिस्तूल नगरी (Pune Crime Special Report) झाली आहे का? असा प्रश्न निर्माण होतोय. निमित्त आहे पुणे शहरात सलग चार दिवसात घडलेल्या चार गोळीबाराच्या घटना… पुण्यात पहिली घटना घडली जंगली महाराज रोडवर, दुसरी हडपसर मध्ये, तिसरी भुमकर चौक आणि आज पहाटे चौथी घटना घडली पुण्याच्या येरवडा परिसरात… या चारही घटनांचा आढावा घेणारा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट ..
शिक्षणाचे माहेरघर असलेलं पुणे शहर गुन्हेगारीचे माहेरघर होतंय.असे चित्र गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झालंय. त्यातच गेल्या चार दिवसात पुण्यात तब्बल चार गोळीबाराच्या घटना घडल्यात. पहिली घटना घडली ती पुण्यातल्या जंगली महाराज रोड परिसरात.. बांधकाम व्यवसायिक असलेल्या धीरज अरगडे यांच्यावर दोन अज्ञात इसमांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही आरोपींनी फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीचे शर्ट घातले होते. दुचाकीवरून आलेल्या या आरोपींनी अरगडे यांच्यावर दोनदा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचवेळी पिस्तूल लॉक झाल्यामुळे गोळी झाडली गेली नाही आणि अरगडे यांचा जीव थोडक्यात वाचला.
दुसरी घटना घडली हडपसर मध्ये… हडपसर मधल्या शेवाळवाडी मध्ये ठेकेदारीच्या वादातून भर दिवसा गोळीबार करण्यात आला. सोसायटीमध्ये कामाला असलेला सिक्युरिटी गार्ड पळवल्याच्या संशयाने एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर गोळीबार केला. यामध्ये तो ठेकेदार गंभीर जखमी झालाय. तर गोळीबार करणाऱ्या माजी सैनिकाला आणि त्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
गोळीबाराची तिसरी घटना घडली नऱ्हे भागात असलेल्या भुमकर चौक परिसरात.. या ठिकाणी घडलेल्या घटनेत फिर्यादी आणि पिडीत यांची एकमेकांशी आधीपासूनची ओळख आहे. या दोघांमध्ये जुने वादही होते. मात्र या घटनेच्या मध्यरात्री काडीपेटी मागितल्याच्या शुल्लक कारणावरून पुन्हा वाद झाले. या वादाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं. आणि ज्या ठिकाणचे सीसीटीव्ही बंद आहेत अशा ठिकाणी गोळीबार केला गेला. यात गणेश गायकवाड नावाची व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
चौथी घटना म्हणजेच आज पहाटे घडलेली घटना येरवड्यातील अग्रेसन शाळेच्या बाहेर घडली. या ठिकाणी नातेवाईक असलेले विकी चांदिले आणि आकाश चांदिले यांच्यात जुन्या वादावरून पुन्हा वाद झाले. आणि आकाशने त्याच्या साथीदारांसह विकी चांदिले यांच्यावर तीन वेळा गोळीबार केला. यातील एक गोळी त्यांच्या पोटात लागली असून त्यांच्यावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गुन्ह्यात एकूण सात आरोपी असून पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत तर एक आरोपी शस्त्रासह फरार असून एक आरोपी स्वतः गंभीर जखमी आहे.
काही दिवसांपूर्वी पर्यंत पुण्यामध्ये कोयता यांची दहशत पहायला मिळत होती. या कोयता गॅंगच्या हालचाली कुठेतरी कमी होत असतानाच आता पुण्यात पिस्तूल गॅंग अॅक्टिव्ह झालीये असं चित्र निर्माण झालंय. सलग चार दिवसात चार गोळीबाराच्या घटना घडणं हे अतिशय भीतीदायक असून त्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालंय. तर दुसरीकडे पोलीस प्रशासन या सगळ्या घटना रोखण्यात अपयशी ठरतंय का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातो. खरंतर या घटना रोखणं हे पुणे पोलिसां पुढचं मोठं आव्हान बनलय. त्यामुळेच आज पुण्याचे नवे आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिसांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर तरी या घटनांना आळा बसणार का? आणि सर्रास पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या या आरोपींवर पोलिसांना वचक ठेवता येणार का ? हे येत्या काळात कळेल…
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
निवडणुकीसाठी कायपण ! निवडणूक लढवण्यासाठी पठ्ठ्यानं केला ‘हा’ कारनामा
Narendra Modi : वर्ध्यात पंतप्रधान मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा
Pune Fire : पुण्यात फिनिक्स मॉलला लागली भीषण आग; अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
Pune News : इस्लामपूर येथील ‘घट्टे ट्रस्ट’ला ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून रुग्णवाहिका भेट
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांची नाशिक लोकसभेमधून माघार
Pune Loksabha : पुण्यात ‘या’ दिवशी होणार मोदींची जाहीर सभा
Pune News : ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाचे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन
Loksabha Election : शाई लावायचं बोट नसेल किंवा दोन्ही हात नसतील तर मतदानाची शाई कुठे लावतात?
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कारवाई होणार? ‘ते’ वक्तव्य भोवण्याची शक्यता
Weather Update : ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा
Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! येरवडा परिसरात पहाटे गोळीबार