Ajit Pawar

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कारवाई होणार? ‘ते’ वक्तव्य भोवण्याची शक्यता

346 0

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. यादरम्यान अजित पवारांचे (Ajit Pawar) टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. यामध्ये अजित पवार यांनी भरसभेत केलेल्या एका वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निधी पाहिजे तर कचा-कचा बटण दाबा, आम्हाला मतदान करा नाहीतर निधीबाबत हात आखडता घ्यावा लागेल असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. या वक्तव्या विरोधात विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा केली. राज्य निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

काय म्हणाले होते अजित पवार?
आपल्या भागाला निधी देण्यासाठी मी कमी पडणार नाही. मात्र तुम्ही मतदान करायला गेल्यावर मशीनमध्ये देखील आपल्या उमेदवाराच्या समोरचं बटन दाबा कचा-कचा म्हणजे मला सुध्दा निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा पण हात आखडता येईल असे वक्तव्य अजित पवारांनी केले. ते इंदापुरात व्यापारी वकील संघटनेच्या बैठकीमध्ये बोलत होते.

अजित पवारांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. विरोधकांनी अजित पवारांच्या या वक्तव्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आता निवडणूक आयोग काय कारवाई करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Lok Sabha Election : देशातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; 21 राज्य, 102 मतदारसंघ; कुठे होणार काँटे की टक्कर?

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! येरवडा परिसरात पहाटे गोळीबार

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!