Pune Crime News

खुनाचा स्क्रू ड्रायव्हर पॅटर्न; पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा चालकाचा स्क्रू ड्रायव्हरने खून

191 0

पिंपरी चिंचवड शहरातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. किरकोळ वादातून एकाने रिक्षा चालकाच्या छातीवर स्क्रू ड्रायव्हरने जोरदार वार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ही घटना चिंचवड जकात नाका परिसरात रात्रीच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड जकात नाक्याच्या परिसरात मयत रिक्षाचालक आणि एका इसमामध्ये वाद सुरू होते. त्यांचे वाद मिटवण्यासाठी इतर लोक प्रयत्न करत होते. मात्र संतापलेल्या या इसमाने ऑटो रिक्षा चालकावर स्क्रू ड्रायव्हरने जोरदार वार केला. हा वार इतका जबर होता की रिक्षा चालकाच्या छातीत खोलवर जखम झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर घाबरलेला आरोपी हा घटनास्थळावरून पसार झाला. मात्र या घटनेची माहिती तात्काळ चिंचवड पोलिसांना देण्यात आली. व पोलिसांनी आरोपीचा शोधही सुरू केला आहे. मात्र किरकोळ कारणावरून आरोपीने थेट रिक्षा चालकाचा खून केल्याने शहरात भीतीच वातावरण निर्माण झालंय

Share This News
error: Content is protected !!