Crime

सोसायटीतील सदस्यांचे आपापसांत वाद, एकाने तोडलं दुसऱ्याचं बोट; वादांमागचं अजब कारण आलं समोर

114 0

पुण्यात नेमकं चाललंय तरी काय ? पुणेकरांना इतका राग का येतोय ? पुण्यात सराईत गुन्हेगारांबरोबरच सुशिक्षित, सर्वसामान्य माणूसही गुन्हेगार होत चालला आहे का ? असे प्रश्न पडण्यासारखा घटना पुण्यामध्ये घडत आहेत. एका मोठ्या आयटी कंपनीच्या संचालकाला सोसायटीतील सदस्यांनी बहिष्कृत केल्याची घटना ताजी असताना सोसायटीतील दोन सदस्यांमध्ये झालेल्या वादातून एकाने चक्क दुसऱ्याचं बोट तुटेपर्यंत मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 1 सप्टेंबर रोजी घडली असून तक्रार 11 सप्टेंबर रोजी देण्यात आली. तर पीडित तरुण तन्मय वीरेन भार्गव (वय 31, रा. श्री गणेश अपार्टमेंट, लोहगाव) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार आरोपी अमोल देवरे (वय 35 रा. श्री गणेश अपार्टमेंट, लोहगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण आणि आरोपी हे दोघेही विमाननगर परिसरातील एका बड्या सोसायटीत राहतात. 1 सप्टेंबरला तन्मय भार्गव हे त्यांच्या सोसायटीतील पार्किंगमध्ये त्यांची कार धूत होते. त्यावेळी आरोपी अमोल देवरे याने त्यांना पार्किंगमध्ये कार धुण्यास नकार देत वाद घातले. त्यावर ‘तुम्ही तुमची गाडी पार्किंगमध्ये धुतली तर चालतं का?’, असा उलट प्रश्न केला. त्यावरून देवरे व भार्गव यांच्यात मोठे वाद झाले. यावेळी शिवीगाळ करत देवरे याने भार्गव यांना मारहाण केली. ही मारहाण इतकी जबर होती की, यात भार्गव यांच्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले. दरम्यान पीडित तरुण हे रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांनी 11 सप्टेंबरला तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर पुन्हा दाखल केला.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!