बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुप्तांगावर एका नर्सने ब्लेडने वाद केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बिहारमध्ये घडली असून संबंधित डॉक्टरसह त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल झाले असून डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे.
डॉ. संजय कुमार संजू असं वाटप करण्यात आलेल्या डॉक्टरचं नाव आहे. तर सुनील कुमार गुप्ता, अवधेश कुमार अशी इतर दोन आरोपींची नावं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टरने आपल्या साथीदारांसह दारू प्यायला होती. त्यानंतर दारूच्या नशेत आरोग्य केंद्रावर कार्यरत असलेल्या नर्सला त्रास देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आरोपी डॉक्टर संजय कुमार संजू याने जेव्हा नर्सचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला तेव्हा नर्स ने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने नर्सला पकडून ठेवल्याने तिला स्वतःची सुटका करून घेता येत नव्हती. त्याचवेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी नर्सने सर्जिकल ब्लेड उचलून त्याच्या गुप्तांगावर हल्ला केला. त्यामुळे आरोपीचे नर्सला सोडले आणि याचा फायदा घेत तिने पळ काढला. मात्र यानंतर इतर आरोपी असलेल्या सुनील आणि अवधेश यांनी नर्सचा पाठलाग करत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र नर्स पळ काढत थेट जवळच्या शेतात जाऊन लपून बसली आणि पोलिसांना संपर्क साधला.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी डॉक्टरसह त्याच्या साथीदारांना अटक केली. जखमी डॉक्टरवर रुग्णालयात उपचार करून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. याबद्दलची माहिती डीएसपी संजय कुमार पांडे यांनी दिली.