Buldhana Bus Accident

Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृत व्यक्तींची नावे आली समोर

1389 0

बुलढाणा : आज पहाटेच्या सुमारास (Buldhana Bus Accident) सिंदखेड राजा तालुक्यात गौ शिवारात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर नागपूरकडून पुण्याच्या दिशेने असलेल्या विदर्भ ट्रॅव्हल क्र. MH29 BE1819 ला भीषण अपघात (Buldhana Bus Accident) होऊन आग लागल्यानं मोठया प्रमाणावर जीवितहानी झाली.

Buldhana Bus Accident

यामध्ये 26 प्रवासी मृत्युमुखी पडले. बस मध्ये एकूण 33 जण प्रवास करत होते. नागपूरहून पुण्याला ही खाजगी बस जात होती. बुलढाण्यातील सिंखेडराजा जवळ परिसरात या बसला अपघात झाला. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. या बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावांची यादी समोर आली आहे.

Shreyanka Patil : श्रेयंका पाटीलने रचला इतिहास, WCPL मध्ये खेळणारी ठरली पहिली भारतीय

डीएनए तपासणीसाठी सर्व मृतदेह बुलढाणा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दुखापतग्रस्त प्रवाशांमधील 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मेहकर रुग्णालयात 1 आणि सिंदखेडराजा रुग्णालयात 2 प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. डिस्चार्ज देण्यात आलेले सर्व प्रवासी संभाजीनगरचे होते. या अपघातात मृत पावलेल्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली तर अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!