जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात वाळूखाली दबून पाच मजुरांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.
जाफराबाद तालुक्यात पासोडी चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम सुरू असून या पुलाचं काम करणारे मजूर तुला शेजारीच पत्र्याचे शेड बांधून राहत होते मध्यरात्री गाड झोपेत असतानाच एका वाळूच्या टिप्परने त्यांच्या पत्राच्या शेड जवळ वाळू खाली केल्याने या मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर एका महिलेसह तेरा वर्षांच्या मुलीला वाचविण्यात यश आला आहे मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.