Tarachand Hospital

Tarachand Hospital : ताराचंद रुग्णालयातील विद्यार्थींनींच्या वसतिगृहात आग

442 0

पुणे : आज सकाळी 8.42 वाजता रास्ता पेठ, ताराचंद रुग्णालयामधील विद्यार्थीनींचे असलेले वसतिगृह येथे आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन मुख्यालय व कसबा अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहने रवाना करण्यात आली.

सदर घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, तळमजला अधिक तीन मजले असलेल्या वसतिगृहात पहिल्या मजल्यावर खोली क्रमांक चारमध्ये आग लागली आहे. जवानांनी प्रथम विद्यार्थीनी सुरक्षित आहेत का व कोणी ही आतमध्ये नाही याची खाञी केली. या खोलीत राहत असलेल्या तीन विद्यार्थीनी आणि वसतिगृहातील इतर सर्वजण बाहेर आले होते. जवानांनी सदर खोलीत आगीवर पाणी मारुन ती इतरञ पसरु न देता सुमारे 10 मिनिटात आगीवर नियंञण मिळवले व नंतर आग पुर्ण विझवली.

या घटनेत खोलीमधील शैक्षणिक साहित्य, लाकडी सामान व इतर वस्तु पुर्ण जळाल्या. आग खोलीमध्ये असणारया हिटरमुळे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आग लागल्याचे समजताच रुग्णालयात असणारया कर्मचारयांनी तेथे उपलब्ध असणारे अंदाजे 18 अग्निरोधक उपकरण (फायर एक्स्टिंग्युशर) वापरुन आग विझवण्याचा मोठा प्रयत्न केला होता.सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

या कामगिरीत अग्निशमन अधिकारी पंकज जगताप, वाहनचालक सचिन चव्हाण, समीर शेख व तांडेल सुनिल नामे, संजय गायकवाड आणि जवान भुषण सोनावणे, सतीश ढमाळे, अक्षय शिंदे, परेश जाधव, केतन नरके, आतिश नाईकनवरे, शुभम देशमुख यांनी सहभाग घेतला.

“अग्निशमन दलाकडून शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, विविध मॉल, इमारती व इतर ठिकाणी आग व आपत्कालिन परिस्थितीत काय उपाययोजना करावी तसेच मार्गदर्शनपर होणारी व्याख्याने यामुळे नक्कीच उपयोग होतो हे आज लागलेल्या आगीत रुग्णालयातील कर्मचार्यांनी आग विझवण्यासाठी प्राथमिक स्वरुपात वापरलेली अग्निरोधक उपकरणे नक्कीच महत्वाची ठरली”
– देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महानगरपालिका 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!