Bus Accident

Bus Accident : तामिळनाडूमध्ये भीषण अपघात! खोल दरीत कोसळली बस

1936 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तामिळनाडूमध्ये बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. निलगिरी जिल्ह्यामध्ये पर्यटक बस 100 फूट दरी कोसळली आहे. या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये बसचालकासह 59 जण प्रवास करत होते. ही बस कुन्नूरमधून तेनकासीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. कुन्नूरमधील मारापलमजवळ दरीत ही बस कोसळली आहे.

काय घडले नेमके?
बसचालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं पोलिसांकडून सांगितलं जातं आहे. या अपघातात मृत पावलेल्यामध्ये 3 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. या अपघातानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तर मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 8 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली आहे.

या अपघाताबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरजवळ बस अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झालं असून मी शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. तर जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो अशा आशयाचे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे. तसेच PMNRF कडून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!