धाराशिव : धाराशिवमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करुन आपल्या आयुष्याचा शेवट (Suicide News) केला आहे. आत्महत्या (Suicide News) करणाऱ्या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलण्याअगोदर काही जणांवर आरोप केले आहेत. त्याच्या या फेसबुक लाईव्हमुळे मोठी खळबळ उडाली. आत्महत्येची (Suicide News) ही धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यातील भूम या ठिकाणी घडली आहे.
Marijuana : अबब…. पुण्यात सापडला 36 किलो गांजा; महाविद्यालयीन तरुणाला अटक
काय घडले नेमके?
फैयाज पठाण असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी बार्शी येथील नंदकुमार स्वामी अर्चना स्वामी आणि यश स्वामी तर भूममधील मल्हार आर्मीचे प्रमुख सुरेश कांबळे यांची नावं घेत त्यांना आपल्या आत्महत्येसाठी जबाबदार धरले आहे. या सर्वांनी जाणीवपूर्वक त्रास देऊन गुंड लावून मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला.
पीडित तरुणाने आज पहाटे 4 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. मी मेल्यानंतर माझ्या मृत्यूसाठी या लोकांना जबाबदार धरावे अशी मागणी त्याने आत्महत्या (Suicide News) करण्याअगोदर केली आहे. या घटनेमुळे भूम शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच फैयाज पठाण याच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.